नवी दिल्ली - वर्णभेद फक्त फुटबॉलमध्येच नव्हे तर क्रिकेटमध्येही आहे, असे वेस्ट इंडीजचा क्रिकेटर ख्रिस गेलने म्हटले. अमेरिकेतील पोलीस कोठडीत झालेल्या जॉर्ज फ्लॉइडच्या मृत्यूनंतर गेलने ही प्रतिक्रिया दिली. "काळ्या लोकांचे जीवन इतर लोकांसारखेच महत्त्वाचे असते. काळे लोक महत्त्वाचे असतात (ब्लॅक लाइव्ह्स मॅटर). वर्णभेदी लोक नरकात जातात", असे गेलने त्याच्या इन्स्टाग्रामवर म्हटले.
गेल म्हणाला, "मी संपूर्ण जगाचा प्रवास केला आहे आणि वर्णभेदाविषयी गोष्टी ऐकल्या आहेत. कारण मी काळा आहे. ही यादी वाढतच जाईल. वर्णभेद फक्त फुटबॉलमध्येच नव्हे तर क्रिकेटमध्येही आहे. संघामध्येही हा फरक मला दिसून आला आहे.''
मॅनचेस्टर युनायटेड आणि इंग्लंडचा फुटबॉलपटू मार्क्स राशफोर्डनेही फ्लॉइडच्या निधनानंतर आपली प्रतिक्रिया दिली. हा समाज पूर्वीपेक्षा अधिक विभागलेला आहे, असे राशफोर्डने म्हटले.