अबुधाबी - जानेवारीत सुरू होणाऱ्या अबुधाबी टी-१० लीगच्या चौथ्या हंगामात ख्रिस गेल खेळणार आहे. टी-२० क्रिकेटमध्ये १०००पेक्षा जास्त षटकार असणाऱ्या गेलला पाहण्यासाठी सर्वजण या लीगची वाट पाहत आहेत. या लीगचे सर्व सामने झायेद क्रिकेट स्टेडियमवर २८ जानेवारी ते ६ फेब्रुवारी दरम्यान खेळले जातील.
हेही वाचा - डॉन ब्रॅडमन यांच्या 'त्या' कॅपचा लिलाव..मिळाली 'इतकी' किंमत
गेल म्हणाला, “सामना जितका छोटा होता असतो, तितता तो आकर्षक होतो. मी पुन्हा झायेद क्रिकेट स्टेडियममध्ये खेळण्यासाठी उत्साहित आहे. अबू धाबी - गेल वादळ येत आहे.'' गेल अबू धाबी संघाचा सदस्य असेल तर आफ्रिदी कलंदर्सचा स्टार खेळाडू असेल. ब्राव्हो दिल्ली बुल्स, आंद्रे रसेल नॉर्दन वॉरियर्स आणि सुनील नारायण डेक्कन ग्लेडिएटर्सकडून खेळेल.
पाकिस्तानमधील माजी कर्णधार शोएब मलिक मराठा अरेबियन्स, श्रीलंकेचा थिसारा परेरा पुणे डेव्हिल्स आणि ईसुरु उदाना बांगला टायगर्सकडून खेळेल. अबू धाबी टी-१० लीग ही पहिली १० षटकांची आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहे. या स्पर्धेला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) आणि अमीरात क्रिकेट मंडळाने मान्यता दिली आहे.