ETV Bharat / sports

धोनीच्या निवृत्तीबाबत निवड समितीचे एमएसके प्रसाद यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

भारतीय संघाचा माजी कर्णधार-यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनी निवृत्ती घोषित करणार, अशा चर्चांना दिवसभरात ऊत आला होता. मात्र, या चर्चा चुकीच्या असल्याचे स्पष्टीकरण निवड समितीचे प्रमुख एमएसके प्रसाद यांनी दिले आहे.

धोनीच्या निवृत्तीबाबत निवड समितीचे एमएसके प्रसाद यांची प्रतिक्रिया, म्हणाले...
author img

By

Published : Sep 12, 2019, 7:29 PM IST

मुंबई - भारतीय संघाचा माजी कर्णधार-यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनी निवृत्ती घोषित करणार, अशा चर्चांना दिवसभरात ऊत आला होता. मात्र, या चर्चा चुकीच्या असल्याचे स्पष्टीकरण निवड समितीचे प्रमुख एमएसके प्रसाद यांनी दिले आहे. आज (गुरुवारी) दक्षिण आफ्रिकेविरुध्दच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. या प्रसंगी ते पत्रकारांशी बोलत होते.

कर्णधार विराट कोहलीने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन धोनीसोबतचा एक फोटो शेअर केला होता. या फोटोवरुन धोनीच्या निवृत्तीची चर्चा दिवसभरात रंगली. मात्र, प्रसाद यांनी दिलेल्या स्पष्टीकरणानंतर या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.

हेही वाचा - Ind Vs SA : आफ्रिकेविरुध्द कसोटी मालिकेसाठी संघ जाहीर; शुभमन गिल 'इन' राहुल 'आऊट'

धोनीच्या निवृत्तीविषयी प्रसाद यांना विचारणा केली असता ते म्हणाले, धोनीच्या निवृत्तीबद्दल कोणतीही माहिती अद्याप आमच्याकडे आली नाही. यामुळे माध्यमांमध्ये सुरू असलेल्या चर्चा या खोट्या आहेत, असं त्यांनी सांगितले.

हेही वाचा - ठरलं रे ठरलं.. ! रोहित शर्मा कसोटीत डावाची सुरुवात करणार

विराट कोहलीने आज गुरुवारी भारतात २०१६ साली झालेल्या टी-२० विश्वकरंडक स्पर्धेतील ऑस्ट्रेलियाविरुध्दच्या सामन्याचा फोटो शेअर केला होता. या फोटोसोबत त्याने, मी हा सामना कधीच विसरणार नाही. ती अविस्मरणीय रात्र होती. धोनीने मला तंदुरुस्तीची चाचणी देत असल्यासारखे पळवले होते. अशा आशयाचा मजकूर लिहला होता.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.