पोटशेफस्ट्रूम - आयसीसी १९ वर्षाखालील विश्व करंडक स्पर्धेचा अंतिम सामना उद्या (रविवार) भारत आणि बांगलादेश या दोन आशियाई संघात खेळला जाणार आहे. या सामन्याआधी भारताच्या सिनियर खेळाडूंनी ज्युनिअर संघाला शुभेच्छा दिल्या आहेत. या शुभेच्छांचा व्हिडिओ बीसीसीआयने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे.
बीसीसीआयने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये चेतेश्वर पुजारा, विजय शंकर, वृध्दीमान साहा आणि अजिंक्य रहाणे ज्युनिअर संघाला शुभेच्छा देताना दिसून येत आहेत.
-
Wishes galore all the way from New Zealand for the U19 team ahead of the #U19CWC final. 🇮🇳🔥💪 #TeamIndia @cheteshwar1 @vijayshankar260 @Wriddhipops @ajinkyarahane88 pic.twitter.com/oCucTeOBzE
— BCCI (@BCCI) February 7, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Wishes galore all the way from New Zealand for the U19 team ahead of the #U19CWC final. 🇮🇳🔥💪 #TeamIndia @cheteshwar1 @vijayshankar260 @Wriddhipops @ajinkyarahane88 pic.twitter.com/oCucTeOBzE
— BCCI (@BCCI) February 7, 2020Wishes galore all the way from New Zealand for the U19 team ahead of the #U19CWC final. 🇮🇳🔥💪 #TeamIndia @cheteshwar1 @vijayshankar260 @Wriddhipops @ajinkyarahane88 pic.twitter.com/oCucTeOBzE
— BCCI (@BCCI) February 7, 2020
चेतेश्वर पुजारा म्हणतो की, 'मी तुम्हाला इतकेच सांगेन की, आतापर्यंत तुम्ही जसे खेळत आलात तसेच खेळा. अंतिम सामन्यात अतिरिक्त दबाव न घेता नैसर्गिक खेळावर भर द्या. मला विश्वास आहे की विश्व करंडक तुम्ही घरी घेऊन याल.'
भारताचा अष्टपैलू विजय शंकर म्हणतो की, 'अंतिम सामना ही एक मोठी संधी आहे त्याचा फायदा घ्या. तुम्हाला खुप शुभेच्छा !'
![Cheteshwar Pujara, Ajinkya Rahane Wish India U-19 Squad Good Luck For World Cup Final](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/6006500_jkjjjj.jpg)
यष्टीरक्षक फलंदाज वृद्धीमान साहाने अंडर-१९ संघ तुम्हाला शुभेच्छा. तुम्ही आतापर्यंत जसे खेळलात तसेच खेळा. समोर कोणता संघ आहे काही फरक पडत नाही, असे म्हटले आहे.
भारतीय कसोटी संघाचा उप-कर्णधार अजिंक्य रहाणेने संपूर्ण देश तुमच्या पाठिशी उभा आहे. आतापर्यंत जसे खेळलात तशीच कामगिरी करा, असे म्हटले आहे.
दरम्यान, १९ वर्षाखालील विश्व करंडक स्पर्धेत भारत आणि बांगलादेश यांच्यात आतापर्यंत ४ सामने झाले आहेत. यापैकी भारताने ३ तर १ सामना बांगलादेशने जिंकला आहे. यामुळे तसेच भारतीय संघाचा फॉर्म पाहता अंतिम सामन्यात भारतीय संघ 'फेव्हरेट' आहे.
हेही वाचा - IND vs NZ : एकदिवसीय मालिकेत भारताचा सलग दुसरा पराभव, न्यूझीलंडने मालिका जिंकली
हेही वाचा - चक्क कर्णधार विराट म्हणतो.. आम्हाला जिंकायचंच नव्हतं, वन-डे आमच्यासाठी महत्वाचं नाही