ETV Bharat / sports

दिल्लीवर विजय मिळवल्यानंतर चेन्नईची गुणतालिकेत 'अव्वल'स्थानी झेप - ipl 2019

आयपीएलच्या या सत्रात दिल्ली आणि चेन्नई हे दोन्ही संघ प्लेऑफसाठी याआधीच पात्र ठरले आहेत

चेन्नई गुणतालिकेत अव्वल
author img

By

Published : May 2, 2019, 1:30 PM IST

चेन्नई - चेन्नईच्या एम.ए. चिदंबरम क्रिकेट स्टेडियमवर बुधवारी खेळल्या गेलेल्या आयपीएलच्या ५०व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने दिल्ली कॅपिटल्सवर ८० धावांनी विजय मिळवला. या विजयासह धोनीच्या चेन्नईने दिल्लीला मागे टाकत आयपीएलच्या गुणतालिकेत १८ गुणांसह अव्वल स्थान पटकावले आहे.

चेन्नई
चेन्नई

चेन्नईविरुद्ध खेळला गेलेल्या सामन्यात दिल्लीचा पराभव झाल्याने त्यांना एका स्थानाचे नुकसान झाले आहे. या पराभवामुळे दिल्लीचा संघ पहिल्या स्थानावरुन दुसऱ्या स्थानी घसरलाय. हा सामना होण्यापूर्वी चेन्नई आणि दिल्लीच्या खात्यात प्रत्येकी १६ गुण होते. मात्र, नेट रन रेटच्या जोरावर दिल्लीने पहिले स्थान काबीज केले होते. आयपीएलच्या या सत्रात दिल्ली आणि चेन्नई हे दोन्ही संघ प्लेऑफसाठी याआधीच पात्र ठरले आहेत.

आतापर्यंत आयपीएलमध्ये चेन्नईने १३ सामने खेळले असुन त्यातील ९ सामने जिंकण्यास त्यांना यश आले आहे. तर 4 सामन्यात चेन्नईला पराभवाचा सामना करावा लागला. आयपीएलच्या गुणतालिकेत मुंबई इंडियन्स १४ गुणांसह तिसऱ्या तर सनरायजर्स हैदराबाद १२ गुणांसह चौथ्या स्थानी आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.