ETV Bharat / sports

'गोड' राजाचा व्हिडिओ व्हायरल! - csk on dhoni video news

या व्हिडीओमध्ये धोनी द्राक्षे खात संघाच्या बसमध्ये जाताना दिसत आहे. त्यांच्यासोबत चिन्ना थाला म्हणजेच सुरेश रैनादेखील आहे. "गोड राजा (द स्वीट किंग इज हिअर). उत्कृष्ट", असे सीएसकेने या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे.

Chennai super kings posted sweet king ms dhoni's video
'गोड' राजाचा व्हिडिओ व्हायरल!
author img

By

Published : May 20, 2020, 9:10 AM IST

चेन्नई - आयपीएलमधील यशस्वी संघ चेन्नई सुपर किंग्जने (सीएसके) मंगळवारी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला. या पोस्टमध्ये सीएसकेने त्याला 'गोड राजा' म्हटले आहे. धोनीचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. यंदाची आयपीएल स्पर्धा धोनीसाठी फार महत्त्वाची मानली जात होती. मात्र, कोरोनामुळे ती अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहे.

या व्हिडीओमध्ये धोनी द्राक्षे खात संघाच्या बसमध्ये जाताना दिसत आहे. त्यांच्यासोबत चिन्ना थाला म्हणजेच सुरेश रैनादेखील आहे. "गोड राजा (द स्वीट किंग इज हिअर). उत्कृष्ट", असे सीएसकेने या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे.

धोनी आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करुन भारतीय संघात पुन्हा स्थान मिळवू इच्छित आहे. पण आयपीएलवर सध्या कोरोनाचे सावट आहे. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी आयपीएल विसरा, असे सूचक संकेत दिले आहे. जर आयपीएल स्पर्धा रद्द झाल्यास धोनीचे भवितव्य अंधारात आहे. आजही धोनीच्या निवृत्तीविषयी सोशल मीडियावर चर्चा सुरू आहेत. पण धोनीने अद्यापही याविषयी कोणतेही संकेत दिलेले नाही.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.