नवी दिल्ली - रविवारी आयपीएलच्या प्रशासकीय समितीची बैठक पार पडली. यामध्ये आयपीएल-2020 बाबत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या बैठकीत आयपीएलच्या 13 व्या हंगामाचे आयोजन 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत होणार असल्याच्या निर्णय घेण्यात आला.
-
IPL 2020 to run for 53 days in UAE subject to Indian govt's approval
— ANI Digital (@ani_digital) August 2, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Read @ANI Story | https://t.co/BHB3WazlVi pic.twitter.com/Nc9AoRb2ow
">IPL 2020 to run for 53 days in UAE subject to Indian govt's approval
— ANI Digital (@ani_digital) August 2, 2020
Read @ANI Story | https://t.co/BHB3WazlVi pic.twitter.com/Nc9AoRb2owIPL 2020 to run for 53 days in UAE subject to Indian govt's approval
— ANI Digital (@ani_digital) August 2, 2020
Read @ANI Story | https://t.co/BHB3WazlVi pic.twitter.com/Nc9AoRb2ow
आयपीएलच्या तेराव्या हंगामांचा रस्ता अखेर मोकळा झाला असून केंद्र सरकारने भारतीय खेळाडूंना युएई प्रवासाची परवानगी दिली आहे. 19 सप्टेंबरपासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. मात्र, स्पर्धेच्या अंतिम सामन्याच्या वेळापत्रकात काही बदल करण्यात आला असून आता नव्या वेळापत्रकानुसार आयपीएल 2020 चा अंतिम सामना 10 नोव्हेंबर रोजी खेळवला जाईल.
आयपीएलच्या प्रशासकीय समितीची रविवारी बैठक पार पडली. यात, आयपीएलच्या नियोजनावर शिक्कामोर्तब करण्यात आले. तसेच स्पर्धेचे अंतिम वेळापत्रक देखील जाहीर करण्यात आले. ही स्पर्धा 19 सप्टेंबरपासून सुरू होईल आणि 53 दिवस चालेल. आयपीएलची फायनल 10 नोव्हेंबर रोजी होईल, ज्यामुळे प्रसारकांना दिवाळीच्या आठवड्याचा फायदा देईल.
-
NEWS: #VIVOIPL 2020 to commence on 19th September, final to be played on 10th November.
— IndianPremierLeague (@IPL) August 2, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
More details 👉 https://t.co/vpM45FAnUQ pic.twitter.com/KnE48kDW1i
">NEWS: #VIVOIPL 2020 to commence on 19th September, final to be played on 10th November.
— IndianPremierLeague (@IPL) August 2, 2020
More details 👉 https://t.co/vpM45FAnUQ pic.twitter.com/KnE48kDW1iNEWS: #VIVOIPL 2020 to commence on 19th September, final to be played on 10th November.
— IndianPremierLeague (@IPL) August 2, 2020
More details 👉 https://t.co/vpM45FAnUQ pic.twitter.com/KnE48kDW1i
केंद्र सरकारची मंजूरी...
मागील अनेक दिवसांपासून आयपीएल स्पर्धेबाबत संभ्रामवस्था निर्माण झाली होती. मात्र, आता भारत सरकारच्या क्रिडा मंत्रालयाने परवानगी दिल्याने सर्व चर्चांना पुर्णविराम मिळाला आहे.
-
IPL final to be played on Nov 10, evening matches to start half-an-hour earlier than usual
— ANI Digital (@ani_digital) August 2, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Read @ANI Story | https://t.co/nnTqw57j41 pic.twitter.com/oLxdy0uJoh
">IPL final to be played on Nov 10, evening matches to start half-an-hour earlier than usual
— ANI Digital (@ani_digital) August 2, 2020
Read @ANI Story | https://t.co/nnTqw57j41 pic.twitter.com/oLxdy0uJohIPL final to be played on Nov 10, evening matches to start half-an-hour earlier than usual
— ANI Digital (@ani_digital) August 2, 2020
Read @ANI Story | https://t.co/nnTqw57j41 pic.twitter.com/oLxdy0uJoh
सामन्यांच्या वेळा बदलल्या...
प्रशासकीय समितीच्या बैठकीअंती, आयपीएलच्या नवीन वेळापत्रकात सामन्यांच्या वेळा बदलण्यात आल्याचे सांगण्यात आले. ज्यानुसार नियमित वेळेत बदल केला असून सामना 90 मिनिटे आधी खेळवण्याचे ठरवले आहे. आता रात्री 8 वाजता ऐवजी सायंकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सामने सुरु होतील.