मेलबर्न - रिकाम्या स्टेडियमवर टी-२० वर्ल्डकपची कल्पना करू शकत नसल्याचे मत ऑस्ट्रेलियाचे दिग्गज कर्णधार अॅलन बॉर्डर यांनी दिले आहे. यावर्षी १८ ऑक्टोबरपासून टी-२० वर्ल्ड कप ऑस्ट्रेलियामध्ये होणार आहे. परंतु जगभरात कोरोना व्हायरसने घातलेल्या थैमानामुळे या स्पर्धेवर अनिश्चिततेचे सावट आहे.
कोरोनामुळे बर्याच देशांनी सीमांवर बंदी घातली आहे आणि अशा परिस्थितीत रिक्त स्टेडियममध्ये ही स्पर्धा आयोजित केली जाऊ शकते, असे लोकांनी असे सुचवले आहे. पण या मताशी बॉर्डर सहमत नाहीत.
बॉर्डर म्हणाले, "टीम, सहाय्यक कर्मचारी आणि खेळाशी संबंधित उर्वरित लोक, जे देशभर फिरत आहेत आणि क्रिकेट खेळत आहेत, परंतु आपण लोकांना मैदानावर येऊ देत नाही. मला हे बघवत नाही. आपल्याला ही स्पर्धा रद्द करावी लागेल अन्यथा ती दुसरीकडे खेळवावी लागेल.''
ऑस्ट्रेलियामध्ये आतापर्यंत कोरोना व्हायरसचे ६ हजारांहून अधिक रुग्ण नोंदवले गेले आहेत. तर, ५० हून अधिक लोकांचा या व्हायरसने जीव घेतला आहे.