ETV Bharat / sports

बंगाल क्रिकेटचे अध्यक्ष आयसीएत देणार योगदान - dalmiya contribute to initiative of ica news

“अविषेक हे नेहमी खेळाडूंना मदत करतात. कठीण काळात त्यांनी आयसीएला मदत करण्याचे आणि ५० हजार रुपये देण्याचे ठरवले आहे,” असे सूत्रांनी सांगितले. क्रिकेटपटू नसलेले अविषेक दालमिया हे या उपक्रमात योगदान देणारे पहिले व्यक्ती आहेत. कपिल देव, सुनील गावस्कर, मोहम्मद अझरुद्दीन आणि राहुल द्रविड यांचा या उपक्रमात समावेश आहे.

cab president avishek dalmiya will contribute to initiative of ica
बंगाल क्रिकेटचे अध्यक्ष आयसीएत देणार योगदान
author img

By

Published : May 17, 2020, 10:23 AM IST

कोलकाता - बंगाल क्रिकेट असोसिएशनचे (सीएबी) अध्यक्ष अविषेक दालमिया यांनी भारतीय क्रिकेट असोसिएशनच्या उपक्रमात (आयसीए) योगदान देण्याचे ठरवले आहे. दालमिया यांच्या जवळच्या सूत्रांनी शनिवारी ही माहिती दिली. या उपक्रमाद्वारे कोरोनाविरूद्धच्या लढाईसाठी मदतनिधी उभारला जाणार आहे.

“अविषेक हे नेहमी खेळाडूंना मदत करतात. कठीण काळात त्यांनी आयसीएला मदत करण्याचे आणि ५० हजार रुपये देण्याचे ठरवले आहे,” असे सूत्रांनी सांगितले. क्रिकेटपटू नसलेले अविषेक दालमिया हे या उपक्रमात योगदान देणारे पहिले व्यक्ती आहेत. कपिल देव, सुनील गावस्कर, मोहम्मद अझरुद्दीन आणि राहुल द्रविड यांचा या उपक्रमात समावेश आहे.

या उपक्रमात आयसीएने आतापर्यंत १० लाख रुपये जमा केले आहेत. आयसीएमध्ये एकूण १५०० खेळाडू नोंदणीकृत असून गेल्या वर्षी या संघटनेची स्थापना केली गेली आहे. आयसीए प्रत्येक विभागातील पाच-सहा माजी क्रिकेटपटूंची निवड आणि मदत करेल.

आयसीएचे अध्यक्ष अशोक मल्होत्रा ​​यांनी सांगितले, “त्यांनी योगदान दिले ही चांगली गोष्ट आहे. आम्ही ५० लाख रुपये गोळा करण्याचा प्रयत्न करत आहोत.’’

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.