ETV Bharat / sports

बुमराहने शेअर केला दिग्गज फुटबॉलपटूचा प्रेरणादायी व्हिडिओ - zlatan ibrahimovic's inspiring video news

रविवारी बुमराहने इब्राहिमोविचचा एक प्रेरणादायक व्हिडिओ 'वर्ड्स टू लिव्ह बाय' या कॅप्शनसह सोशल मीडियावर शेअर केला. या 36 सेकंदाच्या व्हिडिओमध्ये इब्राहिमोविच "मी सोशल मीडियावर राहत नाही" असे म्हणताना दिसत आहे.

Bumrah shared zlatan ibrahimovic's inspiring video
बुमराहने शेअर केला दिग्गज फुटबॉलपटूचा प्रेरणादायी व्हिडिओ
author img

By

Published : May 4, 2020, 5:29 PM IST

अहमदाबाद - भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह स्वीडनचा दिग्गज फुटबॉलपटू झ्लाटन इब्राहिमोविचचा मोठा चाहता आहे. रविवारी त्याने इब्राहिमोविचचा एक प्रेरणादायक व्हिडिओ 'वर्ड्स टू लिव्ह बाय' या कॅप्शनसह सोशल मीडियावर शेअर केला. या 36 सेकंदाच्या व्हिडिओमध्ये इब्राहिमोविच "मी सोशल मीडियावर राहत नाही" असे म्हणताना दिसत आहे.

व्हिडिओमध्ये इब्राहिमोविच म्हणाला, "माझे लक्ष मी कसे प्रदर्शन करतो यावर आहे. मी चांगली कामगिरी कशी करू शकतो हे मला माहित आहे. मी काय करू शकतो याबद्दल मी सर्वोत्तम आहे. बाकीच्या गोष्टींचा काही उपयोग नाही. कारण तुम्ही जर फुटबॉल खेळाडू नसता तर कोण तुम्हाला ओळखेल. कोणीही नाही."

इब्राहिमोविचचा मिलानबरोबरचा हा दुसरा करार आहे. 1999 मध्ये आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणारा इब्राहिमोविच मालमा, अजॅक्स, जुव्हेंटस, इंटर मिलान, बार्सिलोना, एसी मिलान, पीएसजी आणि मँचेस्टर युनायटेड यासारख्या क्लबकडून खेळला आहे. त्यानंतर 2018 मध्ये तो मेजर लीग सॉकर खेळण्यासाठी अमेरिकेत गेला होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.