कोलकाता - आयपीएलच्या दोन हंगामाचा विजेता असलेल्या कोलकाता नाईट रायडर्स संघाने आपल्या नवीन मुख्य प्रशिक्षकाची घोषणा केली आहे. न्यूझीलंड संघाचा माजी कर्णधार ब्रेंडन मॅक्क्युलमला केकेआरच्या मुख्य प्रशिक्षकपदाचा भार सोपवण्यात आला आहे. कोलकाता नाईट रायडर्सच्या क्रिकेट संघाने ट्विटरद्वारे ही घोषणा केली.
-
📣 The announcement you all have been waiting for! 🤩
— KolkataKnightRiders (@KKRiders) August 15, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Put your hands together and welcome @Bazmccullum, our new Head Coach 💜#WelcomeBackBaz #KorboLorboJeetbo pic.twitter.com/tDYz1V9IGz
">📣 The announcement you all have been waiting for! 🤩
— KolkataKnightRiders (@KKRiders) August 15, 2019
Put your hands together and welcome @Bazmccullum, our new Head Coach 💜#WelcomeBackBaz #KorboLorboJeetbo pic.twitter.com/tDYz1V9IGz📣 The announcement you all have been waiting for! 🤩
— KolkataKnightRiders (@KKRiders) August 15, 2019
Put your hands together and welcome @Bazmccullum, our new Head Coach 💜#WelcomeBackBaz #KorboLorboJeetbo pic.twitter.com/tDYz1V9IGz
आयपीलच्या पहिल्या हंगामात ब्रेंडन मॅक्क्युलम हा कोलकाता संघातून खेळला होता. त्याने पहिल्याच सामन्यात बंगळुरु संघाविरुद्ध केलेली १५८ धावांची खेळी अजूनही लोकांच्या लक्षात आहे. २०१६ आणि २०१८ मधील करेबियन प्रीमियर लीग (सीपीएल) आणि त्रिनबागो नाइट राइडर्स या संघाचाही मॅक्क्युलम भाग होता.
कोलकाता संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी या माजी अष्टपैलू खेळाडूची निवड झाल्यानंतर, त्याने आपली प्रतिक्रिया दिली. 'ही जबाबदारी सांभाळणे माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.' असे तो म्हणाला.
त्यानंतर कोलकाता नाईट रायडर्सचे सीईओ विकी मैसुर म्हणाले, 'मॅक्क्युलमने हा कोलकाता नाईट रायडर्स संघाचा खुप जुना सदस्य आहे. त्याच्याकडे नेतृत्व क्षमता, गुणवत्ता, प्रामाणिकपणा, सकारत्मकता हे सर्व गुण आहेत. त्यामुळेच तो संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी योग्य आहे.'