ETV Bharat / sports

'धोनीला टी-२० विश्वकरंडकासाठी टीम इंडियात घेऊ नये'

author img

By

Published : Mar 21, 2020, 9:12 PM IST

ब्रॅड हॉग सोशल मीडियावर, चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देत होता. तेव्हा एका चाहत्याने, ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० विश्वकरंडकासाठी भारतीय संघात धोनीचा समावेश करावा का, असा सवाल केला. यावर हॉगने, धोनीचा समावेश भारतीय संघात करू नये, असे सांगितले.

Brad Hogg against MS Dhoni playing the T20 World Cup in Australia
'धोनीला टी-२० विश्वकरंडकासाठी टीम इंडियात घेऊ नये'

मुंबई - भारताचा अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज महेंद्रसिंह धोनी भारतीय संघात दिसण्याची शक्यता कमी असल्याचे, मत माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी दोन दिवसांपूर्वी व्यक्त केले होते. आता गावस्कर यांच्या पाठोपाठ ऑस्ट्रेलियाचा दिग्गज माजी फिरकीपटू ब्रॅड हॉगने धोनीबाबत मोठे विधान केले आहे.

ब्रॅड हॉग सोशल मीडियावर चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देत होता. तेव्हा एका चाहत्याने, ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० विश्वकरंडकासाठी भारतीय संघात धोनीचा समावेश करावा का, असा सवाल केला. यावर हॉगने, धोनीचा समावेश भारतीय संघात करू नये, असे सांगितले.

तो म्हणाला, धोनी बऱ्याच काळापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. आता धोनीने आयपीएल स्पर्धा खेळली तरी तो पुरेसा ठरणार नाही. ऑस्ट्रेलियातील परिस्थिती आणि भारतातील स्थानिक लीग स्पर्धेतील परिस्थितीत फार फरक असेल. कारण धोनी बहुतेक सामने चेन्नईमध्ये खेळेल. चेन्नईचे मैदान फिरकी गोलंदाजीसाठी उत्तम आहे. तर ऑस्ट्रेलियातील गोलंदाजी जलदसाठी उत्तम असते. ज्या पद्धतीचे वातावरण चेन्नईत असेल तसे ऑस्ट्रेलियात मिळणार नाही.'

  • Pending IPL performances, but sadly I think not, due to lack of international exposure lately & IPL he is playing the majority of games in Chennai (if it goes ahead) which is suited for spin not pace, the conditions he will get in Australia. #hoggytime #IPLT20 https://t.co/KBRJQMOBhF

    — Brad Hogg (@Brad_Hogg) March 21, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

दरम्यान, धोनी इंग्लंडमध्ये झालेल्या एकदिवसीय विश्वकरंडकानंतर एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. यामुळे भारतीय संघात परतणार की नाही, हे सांगणे कठीण आहे. कारण धोनीचा प्रवेश आयपीएलच्या कामगिरीवर अवलंबून आहे. पण, कोरोना विषाणूच्या धोक्यामुळे आयपीएलवर अनिश्चितचे सावट आहे. अशात ऑक्टोबर महिन्यात ऑस्ट्रेलियामध्ये टी-२० विश्वकरंडक होणार आहे. यात धोनीचा समावेश संघात होईल की नाही, यावर चर्चा सुरू आहे.

सुनील गावस्कर यांच्या आधी भारतीय संघाचा माजी सलामीवीर विरेंद्र सेहवागनेही धोनी संघात दिसण्याची शक्यता कमी असल्याचे म्हटलं आहे.

हेही वाचा - टी-२० विश्व कपसाठी ऑस्ट्रेलिया बोर्डाने केली 'ही' मागणी, ICC घेणार मोठा निर्णय?

हेही वाचा - Video : विराटसोबत सेल्फीसाठी 'ती' धावत आली... नंतर काय घडलं

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.