मुंबई - कोरोनाच्या धोक्यामुळे अनिल कुंबळे यांच्या नेतृत्वाखालील क्रिकेट समितीने चेंडूवर लाळेचा वापर करण्यास बंदीचा प्रस्ताव दिला. यावर क्रिकेट तज्ञ आणि खेळाडू आपले मत व्यक्त करत आहेत. भारताचा चायनामॅन फिरकीपटू कुलदीप यादव यानेही मत व्यक्त केले असून त्याने चेंडूला चकाकी आणण्यासाठी लाळेचा वापर ही बालपणापासूनची सवय आहे. ती एकदम सुटणे सोपे नसल्याचे म्हटले आहे. तसेच त्याने उद्भवलेल्या परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी ही सवय मोडण्याचा प्रयत्न करीत असल्याचे सांगितले आहे.
कुलदीप चेंडूवर लाळेचा वापर करण्याविषयी म्हणाला, बदलत्या धोरणानुसार गोलंदाजांना चेंडूवर नियंत्रण मिळविणे फार कठीण जाणार आहे. चेंडूला चकाकी आणण्यासाठी जवळपास सर्वच क्रिकेटपटू लहानपणापासून लाळेचा वापर करतात. मात्र आता बंदी आली. सद्या मी लाळेविना गोलंदाजीचा प्रयत्न करत आहे.'
जेव्हा पूर्वीसारखे क्रिकेट पुन्हा सुरू होईल, तोपर्यत कोरोनाचा प्रादुर्भाव पूर्णपणे संपलेला असेल, अशी मला आशा आहे. अशात लाळेचे अनेक पर्याय पुढे येतील. वर्षानुवर्षे असलेली ही सवय सोडण्याचा प्रयत्न आहे. क्रिकेटपटूंना सरकारच्या दिशानिर्देशांचे पालन करावेच लागेल, असेही कुलदीप म्हणाला.
दरम्यान, चीनच्या वुहान शहरातून जगभरात पसरलेल्या कोरोना विषाणूने हाहाकार माजवला आहे. यामुळे जगभरातील व्यवहार तसेच क्रीडा क्षेत्रातील स्पर्धा ठप्प आहेत. यात आयसीसीने पुन्हा क्रिकेट सुरू करण्याच्या उद्देशाने तयारी सुरू केली आहे. यात त्यांनी खेळाडूंच्या सुरक्षेसाठी चेंडूवर लाळेचा वापर करण्यास बंदी घातली आहे.
हेही वाचा - ..त्या दौऱ्यात पाक क्रिकेट संघ व्यवस्थापनाने माझ्यावर बलात्काराचा आरोप करून संघाबाहेर ठेवले - अख्तर
हेही वाचा - चौथ्या क्रमांकासाठी दावेदारी पण कोणत्याही क्रमांकावर फलंदाजीसाठी सज्ज - श्रेय्यर