नवी दिल्ली - बॉलिवूडची अतिशय सुंदर अभिनेत्री आणि 'चक दे इंडिया' फेम सागरिका घाटगे हिचा आज ३४ वा वाढदिवस आहे. आपल्या चित्रपटाच्या कारकिर्दीपेक्षा सागरिका तिच्या 'लव्ह लाइफ' आणि लग्नाबद्दल जास्त चर्चेत राहिली. सागरिकाने माजी क्रिकेटपटू आणि भारतीय क्रिकेट संघाचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खानशी लग्न केले.
हेही वाचा - संकटात सापडलेल्या मुंबईला आदित्य तरे 'तारणार' का?
सागरिकाचा जन्म ८ जानेवारीला कोल्हापूरच्या राजघराण्यात झाला. तिचे वडील विजेंद्र घाटगे हे बॉलिवूडचे सुप्रसिद्ध अभिनेते म्हणून सर्वांना परिचित आहेत. सागरिकाचे आजोबा कोल्हापूरचे महाराज होते आणि आजी सीता राजे घाटगे इंदूरचे महाराज तुकोजीराव होळकर तिसरे यांची कन्या होती.
सागरिका ही राष्ट्रीय स्तरावरील हॉकीपटू राहिली आहे. खेळाडू असल्याने तिला शाहरुख खानच्या 'चक दे इंडिया' या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. सागरिका-झहीर यांनी जवळपास दीड वर्ष एकमेकांना डेट केले. युवराज सिंगच्या गोव्यात झालेल्या लग्नापासून जयपूरमधील रिसेप्शनमध्येही हे दोघे एकत्र दिसले होते. त्यानंतर २३ नोव्हेंबर २०१७ ला सागरिका आणि झहीर खान लग्नबंधनात अडकले.
आजच्या या स्पेशल दिवशी झहीरने इन्स्टाग्रावर पोस्ट टाकून पत्नीला खास शुभेच्छा दिल्या आहेत. 'वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा सागरिका खान', असे झहीरने कॅप्शनमध्ये म्हटले आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">