ETV Bharat / sports

बिग बॅश लीगमध्ये एका दिवसात गोलंदाजांनी साधली दोन वेळा हॅट्ट्र्रिक, पाहा व्हिडिओ - अॅडिलेड स्ट्रायकर

बिग बॅश लीगच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन राशिद आणि रऊफ यांनी घेतलेल्या हॅट्ट्किचे व्हिडिओ शेअर करण्यात आले आहेत.

big bash league 2019-20 : rashid khan and haris rauf took hat tricks 2-hat tricks in one day in bbl
बिग बॅश लीगमध्ये एका दिवसात दोन हॅट्ट्र्रिक विकेट, पाहा व्हिडिओ
author img

By

Published : Jan 8, 2020, 5:18 PM IST

मेलबर्न - बिग बॅश लीमध्ये आज (ता. ८ बुधवार) दोन सामने खेळवण्यात आले. या दोनही सामन्यात गोलंदाजांनी हॅट्ट्रिक साधली. राशिद खानने अॅडिलेड स्ट्रायकर्सकडून खेळताना हॅट्ट्र्रिक घेतली. तर मेलबर्न स्टार्सकडून खेळताना पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हॅरिस रऊफने ही किमया साधली.

बिग बॅश लीगच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन राशिद आणि रऊफ यांनी घेतलेल्या हॅट्ट्र्रिकचे व्हिडिओ शेअर करण्यात आले आहेत.

रऊफने सिडनी थंडर संघाविरुध्द खेळताना ४ षटकात २३ धावा देत ३ गडी बाद केले. त्याने लागोपाठ मॅथ्यू गिल्क्स, कॅलम फर्गसन आणि डेनियल सॅम्सला बाद केले.

अॅडिलेड स्ट्रायकर आणि सिडनी सिक्सर्स यांच्यात झालेल्या सामन्यात स्ट्रायकरनी दोन विकेटने बाजी मारली. राशिद खानची हॅट्ट्रिक संघाला पराभवापासून वाचवू शकली नाही. राशिदने तीन चेंडूत डेनियल ह्युज, जेम्स विंस आणि जॅक एडवर्ड्सला माघारी धाडले.

हेही वाचा - काय सांगता!..विराटनं घेतली पहिलीच धाव अन् घडला मोठा विश्वविक्रम

हेही वाचा - संकटात सापडलेल्या मुंबईला आदित्य तरे 'तारणार' का?

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.