लखनऊ - २० फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेसाठी अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारला उत्तर प्रदेश क्रिकेट संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. भारताचा माजी डावखुरा फलंदाज सुरेश रैनाला या संघात स्थान मिळालेले नाही.
![भुवनेश्वर कुमार](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/untitled-design-2021-01-11t132137180_1202newsroom_1613116754_899.jpg)
हेही वाचा - भारताविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी इंग्लंड संघाची घोषणा
उत्तर प्रदेश क्रिकेट असोसिएशनच्या प्रवक्त्याने संघाच्या घोषणेची माहिती दिली. तर, फिरकीपटू कर्ण शर्मा संघाची उप-कर्णधारपदाची सूत्रे सांभाळेल. सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत उत्तर प्रदेशच्या खराब कामगिरीनंतर संघाची कमान प्रियम गर्गकडून अनुभवी भुवनेश्वरकडे सोपविण्यात आली आहे. या स्पर्धेत खेळलेल्या रैनाला मात्र, विजय हजारे स्पर्धेसाठी संघात जागा मिळालेली नाही.
खेळाडूंची होणार कोरोना चाचणी
कोरोना संसर्गामुळे बीसीसीआयने खेळाडूंसाठी नियमावली तयार केली आहे. यानुसार सर्व संघ सामन्याच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर त्यांची एकूण तीन वेळा कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. या चाचण्या एक दिवसाआड करण्यात येणार आहेत. चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतरच खेळाडूंना या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे.
उत्तर प्रदेशचा संघ -
भुवनेश्वर कुमार (कर्णधार), करण शर्मा (उपकर्णधार), प्रियांम गर्ग, अक्षदीप नाथ, रिंकू सिंह, समीर चौधरी, माधव कौशिक, अभिषेक गोस्वामी, समर्थ सिंह, अल्मास शौकत, उपेंद्र यादव, आर्यन जुयाल, कार्तिक त्यागी, शिवम मावी, मोहसीन खान, आकीब खान, शानू सैनी, पूर्णक त्यागी, योगेंद्र डोयला, जसमर धनकर, मुनिंद्र मौर्य आणि शिवम शर्मा