ETV Bharat / sports

भारतीय संघात होणार 'महत्त्वाच्या' खेळाडूचे पुनरागमन?

author img

By

Published : Feb 17, 2021, 12:46 PM IST

भुवनेश्वरव्यतिरिक्त मोहम्मद शमी, वॉशिंग्टन सुंदर यांनाही संघात परत आणले जाऊ शकते. यंदा टी-२० विश्वकरंडक स्पर्धा होणार आहे. त्यामुळे भारतीय संघ व्यवस्थापन सर्व गोलंदाजांना आजमावण्याचा प्रयत्न करणार आहे. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले, की भुवनेश्वर कुमार परत येऊ शकतो. याशिवाय शमी मर्यादित षटकांचे काही सामने खेळेल. टी. नटराजन आणि नवदीप सैनीही एकदिवसीय आणि टी-२० मालिकेसाठी संघात पुनरागमन करतील.

भारतीय संघ
भारतीय संघ

नवी दिल्ली - भारतीय संघ इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर मर्यादित षटकांच्या मालिकेकडे लक्ष देणार आहे. या मालिकेसाठी टीम इंडियात महत्त्वाच्या क्रिकेटपटूचे पुनरागमन होण्याची शक्यता आहे. आयपीएलच्या तेराव्या हंगामापासून संघाबाहेर असलेला जलदगती गोलंदाज भुवनेश्वर कुमारला इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय आणि टी-२० मालिकेसाठी संघात स्थान मिळू शकते. आयपीएलदरम्यान भुवनेश्वर दुखापतग्रस्त झाला होता.

हेही वाचा - मोठी बातमी..! क्रिकेटपटू फाफ डू प्लेसिसची कसोटीतून निवृत्ती

संघाचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराहला इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय आणि टी-२० मालिकेमधून विश्रांती दिली जाऊ शकते. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्यानेही याबाबत सांगितले होते. हा अधिकारी म्हणाला, ''जसप्रीत बुमराहने यापूर्वी १८० षटके फेकली आहेत. ऑस्ट्रेलिया दौऱ्या पासून इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यापर्यंत त्याने जवळपास दीडशे षटके फेकली आहेत. याशिवाय त्याने बरेच तास मैदानावरही घालवले. मोटेरा येथे दोन महत्त्वाच्या कसोटी सामन्यानंतर त्याला विश्रांती देणे गरजेचे आहे.''

जसप्रीत बुमराह हा भारताचा आघाडीचा वेगवान गोलंदाज आहे. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात तो भारतीय संघाच्या वेगवान गोलंदाजीचे नेतृत्व करतो, त्यामुळे त्याचे तंदुरुस्त राहणे फार महत्वाचे आहे. सध्या भुवनेश्वर कुमार उत्तर प्रदेशसाठी देशांतर्गत स्पर्धा खेळत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.