सोलापूर - पोलिसांनी आयपीएल सट्टा बाजाराचा पर्दाफाश करत यामध्ये सोलापूर, गुलबर्गा आणि नागपूर येथून संशयित आरोपींना अटक केले आहे. अतिशय तीव्र गतीने आणि मोठ्या शिताफीने गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सट्टाबाजाराची पाळेमुळे खोदून काढली आहेत. यामध्ये आणखीन काही राजकीय वरदहस्त असलेल्या संशयितांची नावे समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सोलापूर आयपीएल सट्ट्याचे नागपूर कनेक्शन
गुन्हे शाखेच्या पोलिसानी सुरुवातीला जाविद लुंझे या सट्टाबाजार करणाऱ्या संशयिताला ताब्यात घेऊन सखोल तपास कर पर्ल हाईट्स येथून आयपीएल सट्टा बाजाराचा अड्डा उध्वस्त केला. अधिक तपास करत चेतन रामचंद्र वन्नालू, विघ्नेश नागनाथ गाजुल, राजेश कुरापटी, भीमाशंकर सुपेकर, अतुल सुरेश शिरशेट्टी, प्रदीप मल्ल्यय्या कारंजे यांना सोलापूर व गुलबर्गा येथून ताब्यात घेतले. त्यानंतर या सट्टाबाजाराचे कनेक्शन नागपूरपर्यंत पोहोचले. आयपीएल सट्टाबाजारातील 'ऑरेंज' म्हणून ओळख असलेल्या अमित उर्फ रिंकू गोविंदप्रसाद अग्रवाल याला व त्यासोबत त्याचे इतर सहकारी सुनील गंगाशाह शर्मा, राहुल प्रसाद काळे यांना सोलापूर गुन्हे शाखेने नागपूरमधून अटक केली.
दोन कारवाईत 'एवढ्या' किमतीचा मुद्देमाल जप्त
सोलापूरातील सट्टाबाजार उधळून लावला. त्यावेळी 38 लाखांचा मुद्देमाल जप्त केला होता. तर नागपूर येथून केलेल्या कारवाईत 53 लाखांचा मुद्देमाल जप्त केला होता आणि या कारवाईवेळी चारचाकी वाहनेदेखील जप्त करण्यात आली होती. यामधील एक चार चाकी वाहन (इनोव्हा कार जप्त) करण्यात आली. हे वाहन गुलबर्गा येथून जप्त करण्यात आले आहे. याचा क्रमांक के.ए .-51- 99 55 आहे.
इनोव्हा कार कुणाची?
गुलबर्गा येथून जप्त करण्यात आलेली इनोव्हा कार (के ए 51-9955) याचा तपास करून ही कार कुणाची आहे?, याचा मालक कोण आहे?, याचा तपास केल्यास कर्नाटक येथील मुख्य आयपीएल सट्टाबाजार करणारा संशयित आरोपी ताब्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कर्नाटकातून मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता
गुलबर्गा येथून झालेल्या कारवाईत दोघां संशयीत आरोपींना अटक करण्यात आली आहे. या दोघांचा गुलबर्गा संबंधाचा अधिक तपास केल्यास आयपीएल सट्टाबाजारातील कर्नाटक येथील मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे.
हेही वाचा - दिवाळी पाडव्याला होणार विठूरायाचे मुखदर्शन; दररोज एक हजार भाविकांना लाभ
हेही वाचा - सोलापूर आयपीएल सट्ट्याचे नागपूर कनेक्शन, तिघांना अटक