मँचेस्टर - इंग्लंडचा अष्टपैलू क्रिकेटपटू बेन स्टोक्स पाकिस्तानविरूद्धच्या उर्वरित कसोटी सामन्यात खेळू शकणार नाही. कौटुंबीक कारणास्तव स्टोक्सने या मालिकेतील दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटीत न खेळण्याचा निर्णय घेतला आहे.
-
JUST IN: Ben Stokes will miss the rest of the #ENGvPAK series due to family reasons. pic.twitter.com/4oCbjiKVdS
— ICC (@ICC) August 9, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">JUST IN: Ben Stokes will miss the rest of the #ENGvPAK series due to family reasons. pic.twitter.com/4oCbjiKVdS
— ICC (@ICC) August 9, 2020JUST IN: Ben Stokes will miss the rest of the #ENGvPAK series due to family reasons. pic.twitter.com/4oCbjiKVdS
— ICC (@ICC) August 9, 2020
''स्टोक्स या आठवड्याच्या शेवटी न्यूझीलंडला जाईल. इंग्लंडविरुद्ध १३ आणि २१ ऑगस्टला एजेस बाऊल येथे पाकिस्तानविरुद्ध होणार्या कसोटी सामन्यात तो खेळू शकणार नाही'', असे ईसीबीने सांगितले आहे. स्टोक्सच्या कुटुंबासह सर्व माध्यमांना कुटुंबाच्या गोपनीयतेचा आदर करण्याची विनंतीही ईसीबीने केली आहे.
२९ वर्षीय ख्राईस्टचर्च येथे जन्मलेला स्टोक्स इंग्लंड संघाचा महत्त्वपूर्ण सदस्य आहे. अलिकडच्या वर्षांतल्या अनेक नेत्रदीपक कामगिरीमुळे स्टोक्स चांगलाच प्रकाक्षझोतात आला. यजमान इंग्लंडने सुरुवातीच्या कसोटीत पाकिस्तानला तीन गड्यांनी मात देत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.