नवी दिल्ली - राष्ट्रीय उत्तेजक सेवन प्रतिबंधक समितीसोबत (नाडा) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) करार केला आहे. हा करार प्रायोगिक तत्वावर ६ महिन्यांचा असणार आहे.
बीसीसीआय, प्रशासकीय समिती आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) यांच्यात झालेल्या एका बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे नोंदणीकृत असलेल्या खेळाडूंची चाचणी नाडाच्या अंतर्गत होणार आहे. यापूर्वी स्वीडनची ‘आयडीटीएम’ खेळाडूंची चाचणी करत होती.
पुढच्या सहा महिन्यात नाडाची काम करण्याची पद्धत बीसीसीआय समाधानी वाटल्यास करार वाढवण्यात येणार आहे. अशी माहिती बीसीसीआयकडून देण्यात आली आहे.