मुंबई - बीसीसीआयने उत्तेजक द्रव्य सेवन केल्याप्रकरणी युवा खेळाडू पृथ्वी शॉचे ८ महिन्यासाठी निलंबन केले आहे. शॉसोबत आणखी दोन भारतीय खेळाडूही या चाचणीत दोषी आढळून आले आहेत. या दोघांवरही बीसीसीआयने निलंबनाची कारवाई केली आहे.
काही तासांपूर्वी बीसीसीआयने भारताचा उद्योन्मुख खेळाडू पृथ्वी शॉसह विदर्भाचा अक्षय दुल्लारवार आणि राजस्थानच्या गजराज याचेही निलंबन केले. हे तिघेही डोपिंगच्या चाचणीत दोषी आढळले. तिघांच्याही चाचणीत त्यांनी उत्तेजक द्रव्य सेवन केल्याचे दिसून आले. यामुळे तिघांवर निलंबनाचा बडगा उगारण्यात आला.
बीसीसीआयने पृथ्वी शॉला १५ नोव्हेंबर २०१९ पर्यंत निलंबन करण्यात आले आहे तर अक्षय दुल्लारवारला ९ नोव्हेंबरपर्यंत तर दिव्या गजराजला २५ सप्टेंबरपर्यंत बंदी घालण्यात आली आहे.