मुंबई - देशात कोरोना रुग्णांचा आकडा पुन्हा वाढू लागला आहे. या कारणाने बीसीसीआयने सर्व वयोगटातील देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा स्थगित करण्याच्या निर्णय घेतला आहे. आयपीएलचा १४वा हंगाम संपल्यानंतर परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेतला येईल, असे बीसीसीआयने सांगितलं आहे. दरम्यान, आयपीएलचा २०२१ चा हंगाम ९ एप्रिल ते ३० मे दरम्यान खेळवला जाणार आहे.
बीसीसीआयने राज्यांमधील क्रिकेट मंडळांना पत्र लिहित यासंदर्भातील माहिती दिली आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी कोरोना परिस्थितीचा संदर्भ देत सध्या सर्व वयोगटातील क्रिकेट स्पर्धा स्थगित करण्यात येत असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, या स्पर्धेचे आयोजन वेगवेगळ्या शहरात होते. त्यामुळे प्रवास तसेच बायो बबलसारख्या गोष्टींची आवश्यकता भासते. यामुळे बीसीसीआयने हा निर्णय घेतला आहे.
आयपीएल लिलावाआधी सय्यद मुस्ताक अली चषक स्पर्धेपासून घरगुती क्रिकेट स्पर्धांना सुरुवात झाली होती. त्यानंतर विजय हजारे करंडक ही देशांतर्गत टी-२० मालिका यशस्वीपणे खेळवण्यात आली. पण आता देशात पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. या कारणाने बीसीसीआयने देशातील सर्व स्थानिक स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा - AFG Vs ZIM १st T२० : अफगानिस्तानच्या विजयात गुरबाज-राशिद चमकले, झिम्बाब्वेचा ४८ धावांनी पराभव
हेही वाचा - महिला क्रिकेट: पराभवाची मालिका सुरूच, पाचव्या वनडेत अफ्रिकेचा भारतावर ५ गडी राखून विजय