ETV Bharat / sports

#IPL तेरावा संपताच चौदाव्या हंगामाची तयारी सुरू; ८ नव्हे तर ९ संघ होणार सहभागी - सूत्र

author img

By

Published : Nov 11, 2020, 3:00 PM IST

बीसीसीआयने आयपीएलच्या चौदाव्या हंगामाची तयारी सुरू केली आहे. या हंगामात ८ नव्हे तर ९ संघ सहभागी होणार असल्याची माहिती मिळत आहे. नववा संघ हा गुजरात किंवा अहमदाबाद असू शकतो.

bcci planing to play with 9 team in ipl
BCCI कडून आयपीएलच्या चौदाव्या हंगामाची तयारी सुरू; ८ नव्हे तर ९ संघ होणार सहभागी - सूत्र

मुंबई - आयपीएलचा तेरावा हंगाम संपून २४ तासही उलटले नाहीत. तर बीसीसीआयने चौदाव्या हंगामाची तयारी सुरू केली आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी याविषयी सांगितले की, आयपीएलच्या चौदाव्या हंगामाचे आयोजन भारतात केले जाईल. याशिवाय एका माध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार चौदाव्या हंगामात ९ संघ सहभागी होणार आहेत.

एका मीडिया रिपोर्टनुसार, बीसीसीआय पुढीलवर्षी होणाऱ्या आयपीएल हंगामाच्या लिलावाबाबत विचार करत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, बीसीसीआय आगामी हंगामात ९ संघ सहभागी करण्याची योजना आखत आहे. कोरोनामुळे झालेली आर्थिक तूट भरून काढणे, यामागचा उद्देश असल्याचे बोलले जात आहे.

याआधी आयपीएलमध्ये नऊ आणि एका हंगामात दहा संघांनी सहभाग नोंदवला होता. २०११ च्या हंगामात दहा संघ तर २०१२ मध्ये ९ संघांनी सहभाग नोंदवला होता. माध्यमाच्या वृत्तानुसार नववा संंघ गुजरात, अहमदाबाद असू शकतो.

दरम्यान, एप्रिल-मे महिन्यात आयपीएलच्या चौदाव्या हंगामाचे आयोजन भारतातच करण्याचा विचार बीसीसीआय करत आहे. याचे संकेत अध्यक्ष सौरव गांगुली यांनी दिले आहेत.

हेही वाचा - IPL 2020 : मुंबईच्या विजयानंतर नीता अंबानी यांचे खेळाडूंबरोबर सेलिब्रेशन

हेही वाचा - IPL 2020 : मुंबईच्या पाचव्या विजेतेपदाबाबत सचिन म्हणाला, अफलातून विजय....

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.