ETV Bharat / sports

महिला आयपीएलबाबत बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी जाहीर केला मोठा निर्णय

आयपीएल स्पर्धेदरम्यान महिलांच्या प्रदर्शनीय सामन्यांचे आयोजन करण्यात येणार आहे. या सामन्यांचे आयोजन पुरुष आयपीएलच्या बाद फेरीदरम्यान (प्लेऑफ) करण्यात येवू शकते.

महिला आयपीएल
author img

By

Published : Feb 26, 2019, 11:54 AM IST

बंगळुरू - गेल्यावर्षी प्रमाणेच यावेळीही आयपीएल स्पर्धेदरम्यान महिलांच्या प्रदर्शनीय सामन्यांचे आयोजन करण्यात येणार आहे. या सामन्यांचे आयोजन पुरुष आयपीएलच्या बाद फेरीदरम्यान (प्लेऑफ) करण्यात येवू शकते.

बीसीसीआयचे अधिकारी म्हणाले, महिलांच्या टी-ट्वेन्टी सामन्याचे आयोजन सायंकाळी ७ वाजता केले जावू शकते. यामुळे जास्तीत जास्त प्रेक्षक सामने पाहण्यासाठी येतील. मात्र, यासंदर्भातील निर्णय निवडणुकांच्या तारखांवर अवलंबून आहे. निवडणूक आयोगाने तारखा जाहिर केल्यानंतर आम्हाला महिलांच्या प्रदर्शनीय सामन्याचे वेळापत्रक जाहीर करता येईल.

गेल्यावर्षी सुपरनोवा आणि ट्रेलब्लेजर्स यांच्यात प्रदर्शनीय सामना खेळवण्यात आला होता. या सामन्यात हरमनप्रीत कौर, स्मृती मंधाना, मेग लॅनिंग, एलिस पेरी आणि सुजी बेट्स या खेळाडूंनी सहभाग घेतला होता. हा सामना रोमांचक झाला होता. पुरुषांच्या सामन्याआधी हा सामना दुपारी घेण्यात आला होता. या सामन्याला प्रेक्षकांनी अल्प प्रतिसाद दिला होता. त्यामुळे या सामन्यांचे नियोजन पुरुषांचे सामने नसतील त्यावेळी सायंकाळी करण्यात येणार आहे, असेही संबंधित अधिकाऱ्याने जाहीर केले.

Intro:Body:

BCCI officers declare decision about Womens IPL

महिला आयपीएलबाबत बीसीसीआयच्या अधिकाऱयांनी जाहीर केला मोठा निर्णय 

बंगळुरू - गेल्यावर्षी प्रमाणेच यावेळीही आयपीएल स्पर्धेदरम्यान महिलांच्या प्रदर्शनीय सामन्यांचे आयोजन करण्यात येणार आहे. या सामन्यांचे आयोजन पुरुष आयपीएलच्या बाद फेरीदरम्यान (प्लेऑफ) करण्यात येवू शकते.

बीसीसीआयचे अधिकारी म्हणाले, महिलांच्या टी-ट्वेन्टी सामन्याचे आयोजन सायंकाळी ७ वाजता केले जावू शकते. यामुळे जास्तीत जास्त प्रेक्षक सामने पाहण्यासाठी येतील. मात्र, यासंदर्भातील निर्णय निवडणुकांच्या तारखांवर अवलंबून आहे. निवडणूक आयोगाने तारखा जाहिर केल्यानंतर आम्हाला महिलांच्या प्रदर्शनीय सामन्याचे  वेळापत्रक जाहीर करता येईल.

गेल्यावर्षी सुपरनोवा आणि ट्रेलब्लेजर्स यांच्यात प्रदर्शनीय सामना खेळवण्यात आला होता. या सामन्यात हरमनप्रीत कौर, स्मृती मंधाना, मेग लॅनिंग, एलिस पेरी आणि सुजी बेट्स या खेळाडूंनी सहभाग घेतला होता. हा सामना रोमांचक झाला होता. पुरुषांच्या सामन्याआधी हा सामना दुपारी घेण्यात आला होता. या सामन्याला प्रेक्षकांनी अल्प प्रतिसाद दिला होता. त्यामुळे या सामन्यांचे नियोजन पुरुषांचे सामने नसतील त्यावेळी सायंकाळी करण्यात येणार आहे, असेही संबंधित अधिकाऱयाने जाहीर केले.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.