नवी दिल्ली - भारतीय क्रिकेट नियामक मंडळ( बीसीसीआय) चे कामकाज पाहण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या समितीने भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षक पदासाठी अर्ज मागविले आहेत. मात्र, सध्याचे प्रशिक्षक रवी शास्त्री हे त्यांच्या पदावर कायम राहिले पाहिजेत, असे बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याचे मत आहे.
तसेच, यावेळी जर संघ व्यवस्थापनात बदल केले तर नविन प्रशिक्षक हे त्यांच्या पद्धतीने काम करण्यास सुरुवात करतील आणि ते संघासाठी ताळमेळ बसण्यात फायद्याचे ठरणार नाही. दीर्घ काळासाठी काही बाबी या कायम राहिल्या पाहिजेत. तसेच, कर्णधार कोहली आणि प्रशिक्षक शास्त्री हे एकमेकांना पूरक आहेत आणि एवढ्यातच निम्मा संघ बदलणे हे धोक्याचे होईल. त्याचा परिणाम संघ बांधणीवरही होऊ शकतो.
सध्याचा काळात संघात बदल झाल्यास, पुढील पाच वर्षांच्या रणनीती आणि योजनेत देखील बदल होईल, कारण भविष्याचा विचार करता 2020 च्या टी -20 विश्वकरंडक स्पर्धेत तरुण खेळाडूंना संधी मिळणे गरजेचे आहे, असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
बीसीसीआयने राष्ट्रीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षक पदासाठी अर्ज मागवले आहेत. तर रवि शास्त्री यांना कुठलाही अर्ज न करता थेट मुलाखतीसाठी प्रवेश मिळणार आहे. विश्वचषक संपल्यानंतर, विद्यमान प्रशिक्षकांचा व कर्मचाऱ्यांचा कालावधी संपला होता, परंतु त्यांचा कार्यकाळ 45 दिवसांनी वाढवण्यात आला आहे.