मुंबई - आयपीएल संपल्यानंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. निवड समितीने या दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा मागील आठवड्यात केली होती. आता यात काही बदल झाले आहेत. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील चार कसोटी सामन्यांपैकी पहिला सामना खेळून भारतात परतणार आहे.
विराटची पत्नी बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा लवकरच आई होणार आहे. आपल्या पहिल्या बाळाच्या जन्मावेळी बायकोसोबत राहण्यासाठी विराटने बीसीसीआयकडे परवानगी मागितली होती. यासाठी त्याने बीसीसीआयकडे रजेची मागणी केली होती. बीसीसीआयने विराटची मागणी मान्य केली असून अॅडलेड कसोटीनंतर विराट भारतात परतणार आहे. बीसीसीआयने याबद्दलची माहिती दिली.
आयपीएलच्या तेराव्या हंगामाचा अंतिम सामना खेळल्यानंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रवाना होईल. या दौऱ्यात भारतीय संघ ३ एकदिवसीय, ३ टी-२० आणि ४ कसोटी सामने खेळणार आहे.
भारताचा सुधारीत संघ
टी-20 - विराट कोहली (कर्णधार) , शिखर धवन, मयांक अग्रवाल, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पांडे, संजू सॅमसन, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, दीपक चहर आणि टी नटराजन.
एकदिवसीय संघ - विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, शुबमन गिल, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, मयांक अग्रवाल, रवींद्र जडेजा, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर आणि संजू सॅमसन.
कसोटी संघ - विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, मयांक अग्रवाल, पृथ्वी शॉ, लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, शुबमन गिल, वृद्धीमान साहा, रिषभ पंत, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, उमेश यादव, नवदीप सैनी, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, आर अश्विन आणि मोहम्मद सिराज.
असा आहे भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा –
- पहिला एकदिवसीय सामना – २७ नोव्हेंबर – सिडनी
- दुसरा एकदिवसीय सामना – २९ नोव्हेंबर – सिडनी
- तिसरा एकदिवसीय सामना – १ डिसेंबर – ओव्हल
- पहिला टी-२० सामना – ४ डिसेंबर – ओव्हल
- दुसरा टी-२० सामना – ६ डिसेंबर – सिडनी
- तिसरा टी-२० सामना – ८ डिसेंबर – सिडनी
- पहिला कसोटी सामना – १७ ते २१ डिसेंबर – अॅडलेड (दिवस-रात्र)
- दुसरा कसोटी सामना – २६ ते ३० डिसेंबर – मेलबर्न
- तिसरा कसोटी सामना – ७ ते ११ जानेवारी २०२१ – सिडनी
- चौथा कसोटी सामना – १५ ते १९ जानेवारी – गाबा