ETV Bharat / sports

भारतीय खेळाडूंची दिवाळी यंदा जोरात, बीसीसीआयकडून दैनिक भत्ता 'डबल'

एका वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत बीसीसीआयने दैनिक भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या वाढीनुसार आता खेळाडूंना डबल पैसे मिळणार आहेत. खेळाडूंना आतापर्यंत भारतात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय मालिकेसाठी १०० डॉलर इतके पैसे मिळत होते. मात्र, आता त्यांना २०० डॉलर दैनिक भत्ता म्हणून देण्यात येणार आहे.

author img

By

Published : Sep 21, 2019, 7:08 PM IST

मुंबई - दिवाळीच्या आधीच बीसीसीआयने भारतीय क्रिकेटपटूना बंपर 'गिफ्ट' दिले आहे. बीसीसीआयने खेळाडूंच्या दैनिक भत्त्यामध्ये वाढ केली आहे. या वाढीव आकड्यांनुसार खेळाडूंना आता डबल पैसे देण्यात येणार आहेत.

एका वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत बीसीसीआयने दैनिक भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या वाढीनुसार आता खेळाडूंना डबल पैसे मिळणार आहेत. खेळाडूंना आतापर्यंत भारतात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय मालिकेसाठी १०० डॉलर इतके पैसे मिळत होते. मात्र, आता त्यांना २०० डॉलर दैनिक भत्ता म्हणून देण्यात येणार आहे.

खेळाडूंना ही वाढ अमेरिकन डॉलरच्या किंमती दररोज बदलत असल्याने, देण्यात येणार आहे. आता भारतीय क्रिकेटपटूंना मायदेशातील मालिकेसाठी दैनिक भत्ता म्हणून ७ हजार ५०० रुपये मिळणार आहेत.

दरम्यान, क्रिकेटपटूंचा दैनिक भत्ता हा त्यांचा प्रवास, राहण्याची व्यवस्था आणि कपड्यांची धुलाई हे वगळून असतो. इतर सर्व जबाबदारी देखील बीसीसीआयची असते. बीसीसीआय क्रिकेटपटूंना मानधन सोडून दैनिक भत्ता देते. महत्वाचे म्हणजे, अंतिम ११ मध्ये जागा न मिळालेल्या खेळाडूंना ही वाढीव भत्ता दिला जातो.

हेही वाचा - कमाईत इंग्लंडचा जोफ्रा आर्चरने विराटला टाकले मागे, मिळवले इतके कोटी

हेही वाचा - आफ्रिकेच्या कसोटी कर्णधाराने अनुभवला 'अत्यंत संतापजनक' विमानप्रवास

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.