नवी दिल्ली - न्यूझीलंडला टी-२० मालिकेत गारद केल्यानंतर, टीम इंडिया आता एकदिवसीय आणि कसोटी मालिकेसाठी सज्ज झाला आहे. आगामी दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली. तत्पूर्वी, भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा दुखापतीमुळे एकदिवसीय आणि कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे.
हेही वाचा - अंडर १९ वर्ल्डकप : आज रंगणार भारत-पाकिस्तान महामुकाबला
कसोटी संघात रोहित शर्माच्या जागी मयांक अग्रवालला संघात स्थान देण्यात आले आहे. अखेरच्या पाचव्या टी-२० सामन्यात खेळत असताना रोहित शर्माच्या पोटरीचे स्नायू दुखावले गेले होते. त्यामुळे त्याला अर्ध्यातच मैदान सोडावे लागले होते. दरम्यान रोहितची दुखापत गंभीर असल्याने, तो एकदिवसीय आणि कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे. काल पीटीआय वृत्तसंस्थेने यासंदर्भात माहिती दिली होती.
-
India’s Test squad: Virat (Capt), Mayank, Prithvi Shaw, Shubman, Pujara, Ajinkya Rahane (vc), Hanuma Vihari, Wriddhiman Saha (wk), Rishabh Pant (wk), R. Ashwin, R. Jadeja, Jasprit Bumrah, Umesh Yadav, Mohd. Shami, Navdeep Saini, Ishant Sharma (subject to fitness clearance).
— BCCI (@BCCI) February 4, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">India’s Test squad: Virat (Capt), Mayank, Prithvi Shaw, Shubman, Pujara, Ajinkya Rahane (vc), Hanuma Vihari, Wriddhiman Saha (wk), Rishabh Pant (wk), R. Ashwin, R. Jadeja, Jasprit Bumrah, Umesh Yadav, Mohd. Shami, Navdeep Saini, Ishant Sharma (subject to fitness clearance).
— BCCI (@BCCI) February 4, 2020India’s Test squad: Virat (Capt), Mayank, Prithvi Shaw, Shubman, Pujara, Ajinkya Rahane (vc), Hanuma Vihari, Wriddhiman Saha (wk), Rishabh Pant (wk), R. Ashwin, R. Jadeja, Jasprit Bumrah, Umesh Yadav, Mohd. Shami, Navdeep Saini, Ishant Sharma (subject to fitness clearance).
— BCCI (@BCCI) February 4, 2020
कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ -
विराट कोहली (कर्णधार), मयांक अग्रवाल, पृथ्वी शॉ, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, वृध्दिमान साहा (यष्टिरक्षक), रिषभ पंत. रविचंद्रन अश्विन, रविंद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, उमेश यादव, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, इशांत शर्मा.
कसोटी मालिका -
- पहिली कसोटी - २१ ते २५ फेब्रुवारी - वेलिंग्टन.
- दुसरी कसोटी - २९ फेब्रुवारी ते ४ मार्च - ख्राइस्टचर्च.