मुंबई - सबा करीम यांना जनरल मॅनेजर (क्रिकेट ऑपरेशन्स) पदावरून पायउतार होण्यास सांगितल्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) जनरल मॅनेजर-स्पोर्ट्स डेव्हलपमेंट पदासाठी अर्ज मागवले आहेत. हे पद मुंबईतील बीसीसीआय मुख्यालयासाठी असेल.
जनरल मॅनेजरचे पद सामन्याचे नियम, खेळपट्टी आणि घरच्या सामन्यांचे वेळापत्रक आणि देखरेख ठेवण्यास जबाबदार असेल. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 7 ऑगस्ट आहे. अर्जांची क्रमवारी लावल्यानंतर उमेदवारांना वैयक्तिक मुलाखतीसाठी मुंबई येथे बोलावण्यात येईल किंवा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांची मुलाखत घेण्यात येईल.
जगातील इतर क्रीडा संस्थांप्रमाणेच बीसीसीआयलाही कोरोना व्हायरसमुळे आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे करीम यांचे स्थान धोक्यात आले होते. करीम यांचे कामात फारसे योगदान नसल्याचे बोर्डाचे मत होते.
उमेदवाराच्या पात्रतेचे निकष -
पदवीधर पात्रता - बॅचलर डिग्री किंवा समकक्ष व्यावसायिक पात्रता.
अर्जदाराचे वय - 55 वर्षांपेक्षा कमी असावे.
क्रीडा प्रशासन अनुभव - क्रिकेट स्पर्धा व्यवस्थापनात 10 वर्षाचा अनुभव असावा.