सिडनी - ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या बिग बॅश लीग स्पर्धेच्या अंतिम सामना पाहण्यासाठी प्रेक्षकांना परवानगी देण्यात आली आहे. पण मैदानाच्या ७५ टक्के प्रेक्षकांना उपस्थितीची परवानगी असेल. बिग बॅश लीगच्या आयोजकांनी याची घोषणा मंगळवारी केली.
बिग बॅश लीगचा अंतिम सामना एससीजी मैदानावर होणार आहे. या मैदानाच्या प्रेक्षक क्षमतेनुसार, ७५ टक्के म्हणजे, २८ हजार ५०० प्रेक्षकांना मैदानावर सामना पाहता येणार आहे. सिडनी सिक्सर्सने स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. तर दुसरा फायनलिस्ट गुरूवारी निश्चीत होईल. पर्थ स्कॉर्चर्स आणि ब्रिस्बेन हीट यांच्यातील विजेता संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरेल.
अंतिम फेरीसाठी उपलब्ध तिकीट विक्री सोमवारी करण्यात आली. सर्व तिकिटे एका तासात विकली गेली. त्यानंतर आयोजकांनी ७५ टक्के प्रेक्षकांचा निर्णय घेतला. वाढलेल्या प्रेक्षकांमुळे न्यू साऊथ वेल्सच्या आरोग्य विभागाकडून अपडेटेड कोविड प्लॅन एससीजीला पाठवण्यात आला आहे.
हेही वाचा - ICC World Test Championship: सोप्या शब्दात जाणून घ्या, कोणता संघ न्यूझीलंडविरुद्ध खेळणार अंतिम सामना
हेही वाचा - भारत-इंग्लंड कसोटी मालिकेबाबत इरफान पठानची भविष्यवाणी, म्हणाला...