ETV Bharat / sports

युवा विश्वचषक : जगज्जेतेपदासाठी भारताचा मुकाबला बांगलादेशशी

न्यूझीलंडचा पराभव करुन बांग्लादेशने अंडर 19 विश्वकरंडकाच्या अंतिम सामन्यात धडक मारली. भारत आणि बांग्लादेश दरम्यान रविवारी अंतिम सामना रंगणार आहे.

जगज्जेतेपदासाठी मैदानात रंगणार वाघांची झुंज

author img

By

Published : Feb 7, 2020, 8:29 PM IST

केपटाऊन - अंडर 19 विश्वकरंडकाच्या अंतिम सामन्यात भारताची गाठ बांग्लादेश सोबत आहे. गुरुवारी न्यूझीलंडचा पराभव करुन बांग्लादेशने अंतिम सामन्यात धडक मारली तर भारताने पाकिस्तानचा पराभव करुन अंतिम सामन्यासाठी आपले स्थान निश्चित केले आहे. अंडर 19 विश्वकरंडकाचा अंतिम सामना येत्या रविवारी(9 जानेवारी) रंगणार आहे.

गुरुवारी झालेल्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात न्यूझीलंडने बांग्लादेशसमोर विजयासाठी 211 धावांचे लक्ष्य ठेवले होते. 4 गड्यांच्या मोबदल्यात बांग्लादेशने हे आव्हान पार करत अंतिम सामन्यात प्रवेश मिळवला. महमुदुल हसनने धमाकेदार शतक साजरे करत संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले.

  • Congratulations to our Young Tigers for making it to the final of ICC U-19 Cricket World Cup South Africa 2020. This is the first time Bangladesh U-19 will be playing final in this competition 👏#BCB pic.twitter.com/piaknlOL7F

    — Bangladesh Cricket (@BCBtigers) February 6, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हेही वाचा - राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का, 'हा' मुख्य खेळाडू आयपीएलमधून बाहेर

अंडर 19 विश्वकरंडकाच्या अंतिम सामन्यात प्रवेश करण्याची बांग्लादेशची ही पहिलीच वेळ आहे. दुसरीकडे आपला पाचवे जगज्जेतेपद जिंकण्यासाठी भारतीय युवा संघ सज्ज आहे. 2020 विश्वकरंडकामध्ये भारत आत्तापर्यंत अपराजित आहे. बांग्लादेशचा संघही चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्यामुळे क्रिकेट रसिकांना अटीतटीचा अंतिम सामना पहायला मिळण्याची शक्यता आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.