मेलबर्न - कोरोनाच्या संकटानंतर क्रिकेटमध्ये चेंडूला चमकवण्यासाठी लाळ किंवा घामाच्या वापरावर ऑस्ट्रेलियामध्ये बंदी घातली जाईल, असे ऑस्ट्रेलियन सरकारने सांगितले आहे. सरकारच्या संकेतस्थळावर जाहीर झालेल्या माहितीनुसार, ऑस्ट्रेलियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्सने (एआयएस) ही बंदी घालण्यासाठी वैद्यकीय तज्ञ, क्रीडा संस्था आणि राज्य सरकारांशी सल्लामसलत करून मार्गदर्शक तत्त्वे घोषित केली आहेत.
या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये, खेळांना तीन टप्प्यात (ए, बी आणि सी) विभागले गेले आहेत. सध्याची बंदी अ पातळीवर आहे, ज्यामध्ये वैयक्तिक सराव सोडून इतर सर्व गोष्टींवर बंदी आहे.
तथापि एका आठवड्यापेक्षा थोड्या अधिक कालावधीनंतर, प्रतिबंध मर्यादा कमी करुन बी-स्तरावर जाईल, ज्यामुळे मर्यादित सराव होऊ शकेल. यावेळी बॉल चमकण्यासाठी लाळ किंवा घामाच्या वापरावरील बंदी कायम राहील.
तिसर्या आणि शेवटच्या टप्प्यातील-सी पातळीला 'पूर्ण सराव आणि स्पर्धा' सवलत असेल. तथापि, बॉलवर लाळ किंवा घामाचा वापर करण्यास मनाई आहे.