ETV Bharat / sports

बटलर म्हणतो, “आयपीएल न होणे ही वाईट गोष्ट” - Jos Buttler latest news

आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळणाऱया बटलरला यावर्षी आयपीएल होण्याची आशा आहे. बटलरने एका वृत्तसंस्थेला सांगितले, की आयपीएल केव्हा होईल हे जितके तुम्हाला माहित आहे तितके मला माहित नाही. सध्या सर्व काही अनिश्चित आहे, हा काळ किती टिकेल हे कोणालाही ठाऊक नाही.

Bad thing that IPL is not happening said Jos Buttler
बटलर म्हणतो, “आयपीएल न होणे ही वाईट गोष्ट”
author img

By

Published : Apr 7, 2020, 6:33 PM IST

लंडन - इंग्लंडचा यष्टिरक्षक-फलंदाज जोस बटलरने म्हटले आहे, की कोरोना व्हायरसमुळे सध्याच्या परिस्थितीत आयपीएल न होणे ही वाईट गोष्ट आहे. आयपीएलची सुरुवात २९ मार्चपासून होणार होती. पण कोरोना व्हायरसमुळे ती १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.

आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळणाऱ्या बटलरला यावर्षी आयपीएल होण्याची आशा आहे. बटलरने एका वृत्तसंस्थेला सांगितले, की आयपीएल केव्हा होईल हे जितके तुम्हाला माहित आहे तितके मला माहित नाही. सध्या सर्व काही अनिश्चित आहे, हा काळ किती टिकेल हे कोणालाही ठाऊक नाही.

स्पर्धेची बाब म्हणून ही खूप मोठी स्पर्धा आहे. आयपीएलमधील कमाई खूपच मोठी आहे. क्रिकेटसाठी ही एक मोठी स्पर्धा आहे आणि जर ती नाही झाली तर ते वाईट ठरेल, असेही बटलर म्हणाला आहे.

यष्टीरक्षक फलंदाज जोस बटलरने कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी आपले योगदान दिले आहे. बटलर २०१९ विश्वकरंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात परिधान केलेल्या जर्सीचा लिलाव करणार आहे. या लिलावाद्वारे मिळणारा निधी तो कोरोनाग्रस्तांच्या उपचारासाठी देणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.