मँन्चेस्टर - आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेमध्ये पाकिस्तान विरुध्द सुरू असलेल्या सामन्यात भारताचा प्रमुख गोलंदाज भुवनेश्वर कुमारला दुखापत झाली आहे. भारताकडून ५ व्या षटकातील चौथ्या चेंडू टाकल्यानंतर भुवनेश्वरचे स्नायू दुखावले, त्यामुळे भुवनेश्वरला चौथ्या चेंडूनंतर गोलंदाजी थांबवावी लागली. हा भारताला धक्का असून या सामन्याला मुकावे लागण्याची शक्यता आहे.
पाकिस्तान विरुध्द गोलंदाजी करताना भुवनेश्वर कुमार याचे स्नायू दुखावले. यामुळे भुवनेश्वरला आपली गोलंदाजी थांबवाली लागली. भुवनेश्वरने दुखापतीपूर्वी २.४ षटके टाकली होती. त्यानंतर त्याचे उर्वरीत २ चेंडू विजय शंकरने टाकले. दरम्यान, भुवनेश्वरची राहिलेली ७ षटके कोण टाकणार हे पहावे लागेल. भुवनेश्वरची दुखापत गंभीर असल्यास त्याला उर्वरित स्पर्धेला मुकावे लागण्याची शक्यता आहे.
सलामीवीर रोहित शर्माचे शतक आणि कर्णधार विराट कोहलीच्या झुंजार अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने पाकिस्तानविरुद्ध सामन्यात त्रिशतकी मजल मारत पाकसमोर ३३७ धावांचे आव्हान ठेवले आहे.