लाहोर - पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) बाबर आझमला एकदिवसीय आणि टी-20 संघाचे कर्णधारपद दिले आहे. तर, बोर्डाने अझर अलीला कसोटी संघाचा कर्णधार म्हणून कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी पीसीबीने खेळाडूंची करार यादी जाहीर करताना ही घोषणा केली.
अझरच्या नेतृत्वात पाकिस्तानला ऑस्ट्रेलियाकडून 0-2 असा पराभव पत्करावा लागला होता. श्रीलंकेविरुद्ध घरच्या मैदानावर झालेल्या मालिकेत मात्र पाकिस्तानने 1-0 ने विजय मिळवला.
संघाचा मुख्य प्रशिक्षक आणि पीसीबी निवड समितीचा प्रमुख मिसबाह-उल-हक म्हणाला, "कर्णधारपदाचा कार्यकाळ वाढवल्याबद्दल मी अझर अली आणि बाबर आझम यांचे अभिनंदन करू इच्छितो. भविष्यासाठी हा योग्य निर्णय आहे. माझा विश्वास आहे ते आता भविष्याकडे पाहत आहेत. हे खेळाडू संघाच्या उत्तम कामगिरीसाठी त्यांच्या योजना आखतील."