ब्रिस्बेन - यजमान ऑस्ट्रेलिया संघाने पाकिस्तान विरुध्दचा पहिला कसोटी सामना एक डाव आणि ५ धावांनी जिंकला. पाकिस्तानच्या दुसऱ्या डावात बाबर आझमने शतकी खेळी केली. मात्र, तोही संघाला लाजिरवाण्या पराभवापासून संघाला वाचवू शकला नाही. पाकिस्तानचा पहिला डाव २४० धावांवर आटोपला. तेव्हा ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ५८० धावा केल्या होत्या. दुसऱ्या डावात पाकिस्तानचा संघ ३३५ धावा करु शकला.
पहिल्या डावाच्या तुलनेत पाकिस्तानने दुसऱया डावात चांगला प्रतिकार केला. मात्र, पाकिस्तानचा संघ आपला पराभव वाचवू शकला नाही. दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत यजमान ऑस्ट्रेलियाने १-० अशी आघाडी घेतली आहे.
बाबर आझमची शानदार खेळी -
पाकिस्तानचा भरवशाचा फलंदाज बाबर आझमने दुसऱ्या डावात शानदार शतक झळकावलं. त्याने १७३ चेंडूचा सामना करत १०४ धावांची खेळी केली. यात १३ चौकारांचा समावेश आहे. बाबर वगळता यष्टीरक्षक फलंदाज रिझवान याने ९५ धावा केल्या. मात्र, त्याला आपले शतक पूर्ण करता आले नाही. रिझवान खालोखाल यासिर शाहने ४२ धावांची खेळी केली.
ब्रिस्बेन कसोटीत ऑस्ट्रेलियाच्या वेगवान माऱ्यासमोर पाकिस्तानचा पहिला डाव २४० धावांवर आटोपला. तेव्हा ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात वार्नर आणि लाबुशेन यांच्या शतकी खेळींच्या जोरावर ५८० धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल पाकिस्तानचा संघ दुसऱया डावात ३३५ धावा करु शकला आणि ऑस्ट्रेलियाने हा सामना एक डाव ५ धावांनी जिंकला.
दुसऱ्या डावात हेडलवुड (४), मिचेल स्टार्क (३), पॅट कमिन्सने २ गडी बाद केले. तर नॅथन लिओनने १ गडी बाद केला.
हेही वाचा - जाणून घ्या...'गुलाबी' कसोटीत टीम इंडियाने केलेले विश्वविक्रम
हेही वाचा - विराट सेनेचे जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत अव्वल स्थान बळकट