ETV Bharat / sports

स्मिथला राहुलची भूरळ, तर सर्वोत्तम क्षेत्ररक्षक म्हणून घेतले 'या' खेळाडूचे नाव

author img

By

Published : Jun 15, 2020, 7:31 PM IST

कोणत्या खेळाडूने सर्वात जास्त प्रभावित केले असे विचारले असता स्मिथ म्हणाला, ''लोकेश राहुल. एक हुशार खेळाडू.'' भारतीय संघ डिसेंबर महिन्यात ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात उभय संघात 4 कसोटी सामन्याची कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे.

australian cricketer steve smith commented on lokesh rahul
स्मिथला राहुलची भूरळ, तर सर्वोत्तम क्षेत्ररक्षक म्हणून घेतले 'या' खेळाडूचे नाव

सिडनी - ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज स्टीव्ह स्मिथला भारतीय फलंदाज लोकेश राहुलने भूरळ घातली आहे. स्मिथने इन्स्टाग्रामवर झालेल्या संवादात आपल्या चाहत्यांना प्रश्नांची उत्तरे दिली.

कोणत्या खेळाडूने सर्वात जास्त प्रभावित केले असे विचारले असता स्मिथ म्हणाला, ''लोकेश राहुल. एक हुशार खेळाडू.'' भारतीय संघ डिसेंबर महिन्यात ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात उभय संघात 4 कसोटी सामन्याची कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे.

या दौऱ्याविषयी स्मिथ म्हणाला, ''मी या मालिकेसाठी उत्सुक आहे. ही एक उत्तम मालिका असेल." स्मिथने भारताच्या रवींद्र जडेजाचे सध्याच्या घडीचा 'सर्वोत्तम क्षेत्ररक्षक' आणि महेंद्रसिंह धोनीचे 'दिग्गज' म्हणून वर्णन केले आहे.

यासोबतच स्मिथने आयपीएलला आपली आवडती स्पर्धा म्हटले आहे. तो म्हणाला, "आयपीएलला हरवणे तितकेसे सोपे नाही. येथे जगभरातील सर्वोत्कृष्ट खेळाडूंसोबत आणि त्यांच्याविरूद्ध खेळण्याची संधी मिळते."

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.