ETV Bharat / sports

ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूला कोरोनाची लागण?

यंदाच्या आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघात असणारा केन रिचर्ड्सनला ऑस्ट्रेलिया संघापासून वेगळे करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच ऑस्ट्रेलियाचा संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरून परतला.

author img

By

Published : Mar 13, 2020, 12:26 PM IST

Australian Cricket Star Ken Richardson Infected with symptoms of Coronavirus
ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूला कोरोनाची लागण?

सिडनी - कोरोना व्हायरसचा कहर जगात सर्वत्र सुरू आहे. फुटबॉल आणि बास्केटबॉलपटूनंतर आता ऑस्ट्रेलियाचा एक क्रिकेटपटूही या आजाराच्या विळख्यात सापडला असल्याचे समोर आले आहे. ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज केन रिचर्ड्सनमध्ये कोरोना संसर्गाची लक्षणे आढळून आली आहेत.

Australian Cricket Star Ken Richardson Infected with symptoms of Coronavirus
केन रिचर्ड्सन

हेही वाचा - कोरोना इफेक्ट : भारत-दक्षिण आफ्रिका मालिकेतील उर्वरित सामने प्रेक्षकांशिवाय

यंदाच्या आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघात असणारा केन रिचर्ड्सनला ऑस्ट्रेलिया संघापासून वेगळे करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच ऑस्ट्रेलियाचा संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरून परतला. 'आमची वैद्यकीय टीम केनच्या घशाच्या संक्रमणावर उपचार करत आहे. आम्ही ऑस्ट्रेलिया सरकारच्या प्रोटोकॉलचे पालन करत आहोत, त्यामुळेच केनला वेगळे ठेवण्यात आले आहे. त्याची तपासणी केल्यानंतर पुढचा निर्णय घेण्यात येईल', असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या एका प्रवक्त्याने सांगितले आहे.

न्यूझीलंडच्याविरोधात पहिल्या एकदिवसीय सामन्यात केनच्याऐवजी सीन अबॉटला संघात स्थान देण्यात आले आहे. आज (शुक्रवारी) दोन्ही संघांमध्ये पहिला सामना होणार आहे. सिडनीच्या मैदानावर हा सामना प्रेक्षकांशिवाय खेळला जाणार आहे.

भारतात रुग्णांचा आकडा ७५, तर महाराष्ट्रात १४ बाधित

देशभरांमध्ये कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. कोरोनाचा पहिला बळीही कर्नाटकात गेला आहे. आत्तापर्यंत ७५ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच अनेकांना देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे आणि पुण्यामध्येही कोरोनाचे आणखी तीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या १४ वर पोहोचली आहे. यामधील पुण्यामधील रुग्ण हा अमेरिकेतून आला होता, तर ठाण्यातील रुग्ण हा फ्रान्सवरून आल्याची माहिती मिळत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.