मेलबर्न - क्रिकेट ऑस्ट्रेलियन काही दिवसांपूर्वीच विश्वकंरडकासाठी आपल्या १५ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. यात बॉल टॅम्परिंग प्रकरणात १ वर्षांची शिक्षा झालेला दिग्गज फलंदाज स्टीव्ह स्मिथलाही स्थान देण्यात आले आहे. इंग्लंडमध्ये येत्या ३० मे पासून विश्वकरंडक स्पर्धा खेळली जाणार आहे. यात कागारुंचा पहिला सामना अफगाणिस्तानविरुद्ध १ जूनला होणार आहे.
cricket.com.au ने दिलेल्या माहितीनूसार, ऑस्ट्रेलियन संघ इंग्लंडमध्ये रवाना झाल्यानंतर सराव सत्रादरम्यान नथन कुल्टर-नाइलच्या चेंडूवर स्मिथने एक दमदार फटका मारला होता. स्मिथचा हा फटका पाहून मला सचिन तेंडुलकरच्या फलंदाजीची आठवण झाल्याचे ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक जस्टिन लँगर यांनी म्हटले आहे.
काही दिवसांपूर्वी न्यूझीलंड एकादश आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या गेलेल्या ३ सराव सामन्यातही स्मिथने शानदार फलंदाजी केली होती. त्यावर बोलताना लँगर म्हणाले की, 'स्मिथ हा एकदिवसीय क्रिकेटचा 'मास्टर' खेळाडू असून ऑस्ट्रेलियन संघात त्याचे हे चांगले पुनरागमन आहे.