नवी दिल्ली - आयपीएल स्पर्धा संपल्यानंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. भारताच्या या दौऱ्याची क्रिकेट चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज वसिम अक्रमने देखील या दौऱ्याबाबत उत्सुकता व्यक्त केली आहे. यात त्याने, उभय संघातील कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाचा संघ विजयाचा दावेदार असल्याचे म्हटलं आहे.
ऑस्ट्रेलियाचा वेगवान मारा सर्वश्रेष्ठ
भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यात तीन टी-२०, तीन एकदिवसीस आणि चार सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या दौऱ्यातील कसोटी मालिकेविषयी अक्रमने आपले मत व्यक्त केले. एका यूट्यूब चॅनलशी बोलताना अक्रम म्हणाला, मला वाटत ऑस्ट्रेलियाचा वेगवान मारा जगामध्ये सर्वश्रेष्ठ आहे. त्यांच्याकडे पॅट कमिन्स, मिशेच स्टार्क, जोश हेजलवूड यासारखे अव्वल गोलंदाज आहेत. यामुळे उभय संघातील मालिका अटातटीची होईल. पण माझे मत आहे की, ऑस्ट्रेलियाचा संघ यात विजयाचा दावेदार आहे.
पुढे अक्रम म्हणाला, जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वात भारतीय संघाचा वेगवान माराही बलशाली आहे. तसेच मोहम्मद शमी, नवदीप सैनी देखील संघात आहेत. यामुळे ही मालिका तोडीस-तोड होईल.
भारतीय खेळाडू जेव्हा मैदानात उतरतात तेव्हा त्याचा आत्मविश्वास पाहण्यासारखा असतो. एक संघ म्हणून त्यांचा स्वत:वर विश्वास आहे. १९९०च्या काळात हा विश्वास आमचा संघ मैदानात उतरताना पाहायला मिळत होता, असे देखील अक्रमने सांगितले.
हेही वाचा - IPL २०२० : RCB विरुद्ध विजय मिळवल्यानंतर वॉर्नर म्हणाला....
हेही वाचा - IPL २०२० : विराटला कर्णधारपदावरून हटवण्याची आली वेळ; दिग्गजाचे मत