मेलबर्न - ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात 'बॉक्सिंग डे' कसोटी सामना मेलबर्नच्या मैदानात खेळवण्यात येत आहे. या सामन्याचे वैशिष्ट्य म्हणजे, न्यूझीलंड तब्बल ३२ वर्षानंतर बॉक्सिंग डे कसोटी खेळत आहे. किवीचा कर्णधार केन विल्यमसनने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. तेव्हा ऑस्ट्रेलियाने पहिल्या दिवसाअखेर ४ बाद २५७ धावा केल्या आहेत. दरम्यान, या सामन्यात ट्रेट बोल्टने जो बर्न्सचा अप्रतिम त्रिफाळा उडवला.
ट्रेट बोल्टने दुखापतीतून सावरल्यानंतर क्रिकेटमध्ये पुनरागमन केले. ऑस्ट्रेलिया विरुद्ध दुसऱ्या कसोटीत खेळताना, त्याने डावाच्या पहिल्याच षटकात जो बर्न्सला त्रिफाळाचित केले. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कारण बोल्टने १३० किलोमीटर वेगाने टाकलेला चेंडू स्विंग करत थेट स्टम्टवर आदळला. फलंदाज बर्न्सला काय झाले हे कळलेच नाही. तो उडालेल्या यष्ट्यांकडे पाहत राहिला.
- View this post on Instagram
What a start for the @blackcapsnz ! Trent Boult strikes in the first over! #AUSvNZ
">
दरम्यान, ऑस्ट्रेलियाने पहिल्या दिवसाअखेर ४ बाद २५७ धावा केल्या आहेत. स्टिव्ह स्मिथ ७७ आणि ट्रेव्हिस हेड २५ धावांवर नाबाद आहेत. तीन सामन्यांच्या मालिकेत बरोबरी साधण्यासाठी न्यूझीलंडला या सामन्यात विजयाची गरज आहे. ऑस्ट्रेलियाने पर्थमधील पहिली कसोटी २९६ धावांनी जिंकत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.
हेही वाचा - पाकच्या 'पंग्या'वर भारताचा दंगा, बीसीसीआयने घेतला 'हा' निर्णय
हेही वाचा - Boxing Day Test : ऑस्ट्रेलिया पहिल्या दिवसाअखेर ४ बाद २५७, स्मिथ नाबाद