नवी दिल्ली - ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानमध्ये होणाऱ्या एकमात्र कसोटी सामन्याची घोषणा करण्यात आली आहे. यावर्षी नोव्हेंबरमध्ये होणारा सामना आता पुढील वर्षी नोव्हेंबरमध्ये होईल. ऑस्ट्रेलिया या सामन्याचे आयोजन करणार असून पर्थमध्ये सामना खेळला जाईल, असे संकेत आहेत.
हेही वाचा - योगायोगाचा १९ डिसेंबर!...एकाच दिवशी भारताने रचली उच्चांकी आणि निचांकी धावसंख्या
अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने (एसीबी) यासंबंधी माहिती दिली. कोरोनामुळे हा सामना स्थगित करण्यात आला होता. एसीबीच्या म्हणण्यानुसार पुढील वर्षी नोव्हेंबरमध्ये सीएबरोबर त्यांनी कसोटी सामन्याच्या करारावर स्वाक्षरी केली आहे.
एसीबीचे नवे सीईओ रहमतुल्ला कुरैशी म्हणाले की, ''ऑस्ट्रेलिया हा एक मजबूत कसोटी संघ आहे आणि २०२१ मध्ये होणाऱया कसोटी सामन्यात आम्ही त्यांच्यासमोर उभे राहू. कोरोनामुळे ही कसोटी पुढे ढकलण्यात आली, पण आता आम्ही आनंदी आहोत."
२०१७मध्ये अफगाणिस्तानला कसोटी संघाचा दर्जा देण्यात आला होता. त्यांनी आतापर्यंत चार सामने खेळले आहेत. त्याने भारताविरुद्धची पहिली कसोटी खेळली ज्यामध्ये ते पराभूत झाला. आयर्लंड आणि बांगलादेशविरुद्ध कसोटी सामने अफगाणिस्तानने जिंकले आहेत.