ETV Bharat / sports

आयपीएल लिलावापूर्वी स्टीव्ह स्मिथची वादळी खेळी! - स्टीव्ह स्मिथ लेटेस्ट न्यूज

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा माजी कर्णधार स्मिथ पुन्हा एकदा चर्चेचा कारण बनला आहे. ऑस्ट्रेलियामध्ये नुकत्यात झालेल्या घरगुती एकदिवसीय सामन्यात स्मिथने शानदार शतक झळकावले. नॉर्थ सिडनी ओव्हल मैदानावर न्यू साउथ वेल्स संघाकडून खेळणार्‍या स्मिथने व्हिक्टोरियाविरुद्ध अवघ्या १२७ धावा फटकावल्या.

स्टीव्ह स्मिथ
स्टीव्ह स्मिथ
author img

By

Published : Feb 16, 2021, 8:41 AM IST

मेलबर्न - यूएईत पार पडलेल्या आयपीएलच्या तेराव्या पर्वानंतर आता चौदाव्या पर्वाची तयारी सुरू झाली आहे. आयपीएलमधील सहभागी फ्रेंचायझींनी त्यांच्या संघात कायम ठेवलेल्या आणि संघातून रिलिज केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली होती. यात राजस्थान रॉयल्सने दिग्गज फलंदाज स्टीव्ह स्मिथला रिलिज करत सर्वांना थक्क केले. मात्र, आयपीएल लिलावापूर्वी, स्मिथने वादळी खेळी करत आपण तयार असल्याचे दाखवून दिले आहे.

हेही वाचा - रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिज : दोन नव्या संघांचा समावेश

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा माजी कर्णधार स्मिथ पुन्हा एकदा चर्चेचा कारण बनला आहे. ऑस्ट्रेलियामध्ये नुकत्यात झालेल्या घरगुती एकदिवसीय सामन्यात स्मिथने शानदार शतक झळकावले. नॉर्थ सिडनी ओव्हल मैदानावर न्यू साउथ वेल्स संघाकडून खेळणार्‍या स्मिथने व्हिक्टोरियाविरुद्ध अवघ्या १२७ धावा फटकावल्या. त्याने आपल्या खेळीत ९ चौकार आणि ६ षटकारही ठोकले. या शतकासह त्याने आगामी आयपीएल लिलावासाठी आपण फॉर्मात असल्याचे सिद्ध केले.

स्टीव्ह स्मिथ
स्टीव्ह स्मिथ

स्टीव्ह स्मिथ गेल्या वर्षीपर्यंत राजस्थान रॉयल्स संघातून कर्णधार म्हणून खेळताना दिसला होता, पण यावेळी संघाने त्याला रिलिज केले. राजस्थानने यंदा संजू सॅमसनला नवा कर्णधार म्हणून नियुक्त केले. गुरुवारी १८ फेब्रुवारीला चेन्नईला आयपीएलची लिलावप्रक्रिया पार पडणार आहे. या लिलावात प्रत्येकाचे स्मिथवर लक्ष असेल. स्मिथची बेस प्राईज २ कोटी आहे. आतापर्यंत खेळल्या गेलेल्या ९५ आयपीएल सामन्यांमध्ये त्याने १२९.२५ च्या स्ट्राईक रेटने २३३३ धावा केल्या आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.