सिडनी - यजमान ऑस्ट्रेलिया संघाने तिसऱ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात, तिसऱ्या दिवसाअखेर २४३ धावांची आघाडी घेतली आहे. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीसमोर न्यूझीलंडचा पहिला डाव २५१ धावात आटोपला. तेव्हा ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात बिनबाद ४० धावा केल्या आहेत. डेव्हिड वॉर्नर (२३), जो बर्न्स (१६) नाबाद खेळत आहेत.
यजमान ऑस्ट्रेलिया संघाकडे २४३ धावांची आघाडी आहे. तीन दिवसाचा खेळ संपला असून आणखी दोन दिवस शिल्लक असल्याने ऑस्ट्रेलिया चौथ्या दिवशी न्यूझीलंडसमोर मोठे लक्ष्य देण्याच्या दृष्टीने खेळ करेल.
तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाचा नॅथन लिओनच्या फिरकीसमोर न्यूझीलंडच्या फलंदाजांनी शरणागती पत्कारली. लिओनने ६८ धावा देत निम्मा संघ माघारी धाडला. न्यूझीलंडकडून कसोटी पदार्पण करणाऱ्या ग्लेन फिलिप्सने ५२ धावांची खेळी केली. ग्लेन वगळता अन्य फलंदाजांना अपेक्षित कामगिरी करता आली नाही.
ऑस्ट्रेलियाकडून नॅथन लिओनने ५ गडी बाद केले. तर त्याला पॅट कमिन्सने ३ गडी बाद करत चांगली साथ दिली. मिचेल स्टार्कने एक गडी बाद केला.
दरम्यान, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड संघात तीन सामन्याची कसोटी मालिका खेळवण्यात येत आहे. पहिले दोन सामने यजमान ऑस्ट्रेलियाने जिंकत मालिकेत २-० ने विजयी आघाडी घेतली आहे. अखेरचा सामना जिंकून न्यूझीलंडला 'क्लीन स्वीप' करण्याच्या उद्देशाने ऑस्ट्रेलिया मैदानात उतरली आहे.
हेही वाचा - बाप रे...! रणजी सामन्यादरम्यान मैदानात शिरले दोन साप
हेही वाचा - INDvsSL : नवीन वर्षाची सुरुवात विजयाने करण्याचा दोन्ही संघांचा मानस