मेलबर्न - ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड संघात उद्या (गुरूवार ता. २६) पासून 'बॉक्सिंग डे' कसोटीला सुरुवात होणार आहे. न्यूझीलंडने या सामन्यासाठी आपल्या संघात दोन बदल केले आहेत.
दुखापतीतून सावरल्यानंतर न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेट बोल्ट बॉक्गिंग डे कसोटीत खेळणार आहे. तर जीत रावलच्या ठिकाणी टॉम ब्लंडेल याला अंतिम संघात स्थान देण्यात आले आहे.
बोल्ट दुखापतीमुळे पहिला सामना खेळू शकला नव्हता. न्यूझीलंडला या सामन्यात यजमान संघाने २९६ धावांनी मात केली होती. दरम्यान, उभय संघात तीन सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. पहिला सामना ऑस्ट्रेलिया संघाने जिंकत मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे.
बॉक्सिंग डे कसोटीआधी न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने सांगितलं की, 'रावलच्या ठिकाणी ब्लंडेल याला संघात संधी देण्यात आली आहे. तो टॉम लॅथम सोबत डावाची सुरूवात करेल. ब्लंडेल सकारात्मक विचाराने खेळणारा समजूतदार खेळाडू आहे. त्याला केवळ परिस्थितीचे भान ठेऊन खेळ करावा लागणार आहे.'
हेही वाचा - Merry Christmas : सचिन ते पाँटिंगपर्यंत... वाचा क्रिकेटपटूंचा नाताळ सण
हेही वाचा - आयसीसी कसोटी क्रमवारी : कोहलीचे वर्चस्व तर, 'या' मुंबईकर क्रिकेटपटूचे स्थान घसरले