सिडनी - ऋषभ पंत पाठोपाठ भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजा याला देखील रुग्णालयात स्कॅनसाठी नेण्यात आले आहे. जर दोन्ही खेळाडूंची दुखापत गंभीर असल्यास, भारतीय संघासाठी हा मोठा धक्का असणार आहे.
-
UPDATE - Ravindra Jadeja suffered a blow to his left thumb while batting. He has been taken for scans.#AUSvIND pic.twitter.com/DOG8SBXPue
— BCCI (@BCCI) January 9, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">UPDATE - Ravindra Jadeja suffered a blow to his left thumb while batting. He has been taken for scans.#AUSvIND pic.twitter.com/DOG8SBXPue
— BCCI (@BCCI) January 9, 2021UPDATE - Ravindra Jadeja suffered a blow to his left thumb while batting. He has been taken for scans.#AUSvIND pic.twitter.com/DOG8SBXPue
— BCCI (@BCCI) January 9, 2021
तिसऱ्या दिवशी पहिल्या सत्रामध्ये चेतेश्वर पुजारा आणि ऋषभ पंत या दोघांनी ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीचा धैर्याने सामना केल्या. या दरम्यान, चेंडू अचानक उसळी घेत असल्याचे पाहावयास मिळाले. पॅट कमिन्सचा चेंडू पंतला लागला. यामुळे काही काळ सामना थांबण्यात आला. प्राथमिक उपचारानंतर पुन्हा सामना सुरू झाला. तेव्हा पंत हेझलवूडच्या गोलंदाजीवर बाद झाला. पंत पाठोपाठ पुजारा देखील पॅव्हेलियनमध्ये परतला. तेव्हा रविंद्र जडेजाने तळाच्या फलंदाजांना हाती घेत किल्ला लढवण्याचा प्रयत्न केला.
जडेजाला यादरम्यान, दुखापत झाली. त्याच्या डाव्या हाताच्या बोटाला दुखापत झाली आणि त्याला स्कॅनसाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. याची माहिती बीसीसीआयने ट्विट करत दिली. जडेजाने पहिल्या डावात सर्वाधिक ४ गडी बाद केले होते. याशिवाय त्याने शतकवीर स्टिव्ह स्मिथला अप्रतिम थेट फेकीवर धावबाद करत सामन्याला कलाटणी दिली. दरम्यान, ऋषभ पंतला देखील स्कॅनसाठी रुग्णालयात नेण्यात आले आहे. याआधीच दुखापतीमुळे इशांत शर्मा, मोहम्मद शमी, आणि उमेश यादवसारखे अनुभवी खेळाडू बॉर्डर-गावसकर मालिकेला मुकले आहेत.
हेही वाचा - Ind vs Aus, 3rd Test : पंचाच्या निर्णयावर भडकला टिम पेन; हुज्जत घालत वापरले अपशब्द
हेही वाचा - IND VS AUS : ऋषभ पंतला दुखापत, वृद्धीमान साहा यष्टीरक्षणासाठी मैदानावर