ETV Bharat / sports

CSK VS DC : अश्विनला आज 'हा' विक्रम करण्याची संधी - रविचंद्रन अश्विन

ऑलओव्हर टी-२० क्रिकेटमध्ये २५० गडीचा टप्पा गाठण्यासाठी अश्विनला २ गडी बाद करण्याची गरज आहे. त्याने टी-२० च्या २४७ सामन्यात २४८ खेळाडूंना बाद केले आहे.

ashwin-just-two-wickets-shorts-to-complets-250-wickets-in-t20-format
CSK VS DC : अश्विनला आज 'हा' विक्रम करण्याची संधी
author img

By

Published : Apr 10, 2021, 3:47 PM IST

मुंबई - आयपीएल २०२१ च्या हंगामातील दुसरा सामना आज मुंबईच्या वानखेडे स्टेडियमध्ये रंगणार आहे. चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात हा सामना होणार आहे. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन याला एक मोठा विक्रमाला गवसणी घालण्याची संधी आहे.

ऑलओव्हर टी-२० क्रिकेटमध्ये २५० गडीचा टप्पा गाठण्यासाठी अश्विनला २ गडीची गरज आहे. त्याने टी-२० क्रिकेटमधील २४७ सामन्यात २४८ खेळाडूंना बाद केले आहे. ३४ वर्षीय अश्विनने २००७ मध्ये आंध्राविरोधात पहिला टी-२० पदार्पणाचा सामना खेळला होता. तर २०१० मध्ये त्याने झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाकडून डेब्यू केला.

अश्विन २००९च्या आयपीएल हंगामात सीएसकेसाठी पहिला सामना खेळला. तो चेन्नई सुपर किंग्ज, रायझिंग पुणे सुपरजायंट, पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स या संघाकडून खेळला आहे.

आज चेन्नईविरुद्धच्या सामन्यात त्याने जर दोन गडी बाद केले तर तो २५० गडीचा टप्पा गाठत अशी कामगिरी करणारा भारताचा तिसरा गोलंदाज ठरेल. याआधी पियूष चावला आणि अमित मिश्रा या दोघांना ही कामगिरी करता आलेली आहे.

टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक गडी बाद करणारे भारतीय गोलंदाज -

  • पियूष चावला - २४९ सामने - २६२ विकेट्स
  • अमित मिश्रा - २३२ सामने - २५६ विकेट्स
  • रविचंद्रन अश्विन - २४७ सामने - २४८ विकेट्स
  • हरभजन सिंह - २६५ सामने - २३५ विकेट्स

हेही वाचा - IPL २०२१ : RCB च्या ७ फूट उंचीच्या गोलंदाजाने कृणाल पांड्याची बॅट तोडली, व्हिडिओ व्हायरल

हेही वाचा - IPL २०२१ : दिल्लीविरुद्धच्या सामन्यात सॅम कुरेन गेम चेंजर ठरू शकतो, दिग्गजाचे भाकित

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.