मँचेस्टर - ऑस्ट्रेलियाने अॅशेस मालिकेतील चौथा कसोटी सामना जिंकत २-१ ने आघाडी घेतली आणि अॅशेस चषक आपल्याकडे राखला. या मालिकेत आणखी एक सामना शिल्लक असून हा सामना जरी यजमान इंग्लंड संघाने जिंकला तरी ऑस्ट्रेलियाचा संघ गतविजेता असल्याने चषक ऑस्ट्रेलियाकडेच राहणार आहे. या विजयानंतर ऑस्ट्रेलियाचा माजी यशस्वी कर्णधार रिकी पाँटिंगने प्रतिक्रिया दिली.
या विजयाबाबत बोलताना पाँटिंग म्हणाला की, ऑस्ट्रेलिया संघाला मिळालेल्या यशामध्ये गोलंदाजांचे योगदान महत्त्वाचे आहे. विजयाचे श्रेय गोलंदाजांनाही दिले जावे.
"आत्तापर्यंत मी पाहिलेल्या फलंदाजांपैकी स्मिथच भारी"
चेंडू छेडछाड प्रकरणानंतर स्टिव्ह स्मिथने अॅशेस मालिकेतून पुनरागमन केले असून या मालिकेत स्मिथने तीन शतकासह ६७१ धावा केल्या आहेत. यावर पाँटिंग म्हणाला की, प्रत्येक जण स्मिथच्या फलंदाजीविषयी चर्चा करत आहे. मात्र ऑस्ट्रेलियाने मिळवलेल्या यशात स्मिथसोबत संघातील गोलंदाजांचेही योगदान आहे. मालिकेत गोलंदाजांनी अप्रतिम गोलंदाजी केली. असं त्यानं सांगितलं.
अॅशेस : चौथ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा विजय, मालिकेत 2-1 ने आघाडी
मिशेल स्टार्क, पॅट कमिन्स, जोस हेझलवूड आणि नॅथन लिऑन यांनी चांगली गोलंदाजी केली. यामुळे ऑस्ट्रेलियाचा संघ गोलंदाजीच्या आक्रमणातही इंग्लंडच्या बरोबरीत होता. असेही पाँटिंग म्हणाला. दरम्यान, ऑस्ट्रेलिया संघाने ५ कसोटी सामन्याच्या मालिकेत २-१ ने आघाडी घेतली आहे. या मालिकेतील शेवटचा सामना १२ सप्टेंबरपासून खेळला जाणार आहे.