मुंबई - कोरोनामुळे संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आला असून सगळेच लोक आपापल्या घरात कुटुंबियासोबत वेळ घालवत आहेत. खेळाडूसुद्धा आता घरात आहेत. या काळात ते सोशल मीडियावरून चाहत्यांशी संवाद साधत आहेत. भारतीय महिला क्रिकेट संघाची सलामीवीर स्मृती मानधानानेसुद्धा सोशल मीडियावर चाहत्यांशी संवाद साधला. यावेळी तिने चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नांना दिलखुलास उत्तरे दिली.
स्मृतीला एका चाहत्याने विचारले की, तु सिंगल आहेस का? यावर तिने, मला माहिती नाही, असे उत्तर दिले.
तु सुंदर तर आहेसच आणि अभिनेत्रीसारखा अभिनय करू शकतेस. तु चित्रपटात काम करशील का? असा प्रश्न एका चाहत्याने विचारला. यावर स्मृतीने हसत असलेला इमोजी टाकत म्हटलं की, 'मला नाही वाटत की मला पाहण्यासाठी कोणी थिएटरमध्ये येईल.'
एका चाहत्याने, तु क्रिकेट मालिकेसाठी बराच काळ घराबाहेर असतेस तेव्हा तुझ्या कुटुंबाची रिअॅक्शन कशी असते, असे विचारले असता. यावर स्मृतीने मजेशीर उत्तर दिलं. ती म्हणाली, माझे तोंड पाहून घरचे कंटाळले आहेत. ते आशा करत असतात की माझा पुढचा दौरा लवकरात लवकर यावा. पण मी हे मजा म्हणून सांगत आहे. आम्ही खूप छान वेळ घालवतो आणि नेहमी हसत खेळत असतो.
दरम्यान, कोरोनामुळे सर्व क्रीडा स्पर्धा ठप्प आहेत. यामुळे खेळाडू आपापल्या घरीच कुटुंबियांसोबत वेळ घालवत आहेत. या काळात बीसीसीआयच्या BCCI Women या अधिकृत ट्विटर हँडलने क्रिकेट चाहत्यांना स्मृतीला त्यांच्या मनातले प्रश्न विचारण्याची संधी दिली. तेव्हा चाहत्यांनी या संधीचा लाभ घेत स्मृतीला अनेक प्रश्न विचारले.
स्मृतीने लग्नासाठी ठेवल्या दोन अटी; वाचा, लव मॅरेज करणारी की अरेंज्ड?