मुंबई - कोरोना विषाणूच्या फैलावामुळे भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली पत्नी अनुष्का शर्मासह घरातच क्वालिटी टाईम घालवत आहे. भलेही दोघे कुठेही असले, तरी ते सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असतात. अनुष्काने काही तासांपूर्वी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून एक फोटो शेअर केला आहे. त्यात दोघेही वेडेवाकडे तोंड करून वाकुल्या दाखवताना दिसत आहेत. या फोटोला नेटकऱ्यांनी चांगलीच पसंती दर्शवली आहे.
फोटोसोबत अनुष्काने, सर्व गोष्टींपासून विभक्त होऊन स्वतःला घरात बंद केल्यामुळे, तुम्हाला एकदुसऱ्याकडून खूप प्रेम मिळतं. असे मजेशीर कॅप्शन दिलं आहे. अनुष्काच्या या फोटाला भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाने हृदयाचा इमोजी पोस्ट केला आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
दरम्यान, याआधी विराट आणि अनुष्का शर्मा यांनी एक व्हिडिओ शेअर करुन कोरोनापासून बचाव करण्यासाठी सरकारकडून येणाऱ्या निर्देशांचे पालन करावं, असे आवाहन केलं आहे. त्यात त्यांनी आवश्यक असेल तेव्हाच घराबाहेर पडावं, असेही म्हटलं आहे. २०१७ साली विराट आणि अनुष्का यांचे इटलीत लग्न झालं. त्याआधी विराट-अनुष्का अनेक वर्ष रिलेशनशीपमध्ये होते.
हेही वाचा - 'धोनीला टी-२० विश्वकरंडकासाठी टीम इंडियात घेऊ नये'
हेही वाचा - Video : विराटसोबत सेल्फीसाठी 'ती' धावत आली... नंतर काय घडलं